भोंग्यांची ढकला – ढकली!! : संजय राऊतांची केंद्रावर; वळसे पाटलांची सर्वपक्षीय बैठकीवर!!


मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय उचलला काय… त्यांना महाराष्ट्रासह देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण त्यामुळे महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार सरकारला हलावे लागले. आधी शरद पवारांनी “अदखलपात्र” म्हणून जो राज ठाकरे यांचा विषय झटकला होता, तोच विषय महाराष्ट्र सरकारला पुरून उरलेल्या दिसला आणि शेवटी राज ठाकरे यांनी काढलेला भोंग्यांच्या विषयाची ढकलाढकली सुरू झाली…!! Sanjay Raut at the center; At the all-party meeting of Valse Patil

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांचा विषय केंद्र सरकारवर ढकलून दिला, तर ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी भोंग्यांचा विषय सर्वपक्षीय बैठकीवर ढककला आहे… इतकेच नाही तर कोठेही भोंगे लावणे आणि उतरवणे हे काम आणि जबाबदारी सरकारची नाही, असे वक्तव्य देखील वळसे-पाटील यांनी केले आहे. मात्र त्याच वेळी दिलीप वळसे-पाटील यांनी कोणालाही भोंगे लावायचे असतील तर पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. सुप्रिम कोर्टाचे आदेश पाळावे लागतील, असेही स्पष्ट केले आहे.

मात्र या सगळ्या प्रकारात जे राज ठाकरे शरद पवारांनी “अदखलपात्र” ठरवले होते, ते पूर्णपणे दखलपात्रच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणावर छाया पसरून बसल्याचे दिसून येत आहे…!!

संजय राऊत यांनी सामना अग्रलेख लिहून केंद्र सरकारने भोंग्यांवर “राष्ट्रीय धोरण” ठरवावे. सर्वांना समान न्याय द्यावा. गोवंश हत्या बंदी कायदा सारखा दुटप्पीपणा करू नये. काही राज्यांना सवलत देऊ नये. सर्वांना समान न्याय देऊन भोंग्यांविषयी “राष्ट्रीय धोरण” ठरवावे, असा उपदेश केंद्र सरकारला केला आहे. एक प्रकारे हा विषय त्यांनी केंद्रावरच ढकलून दिला आहे, तर भोंगे लावणे आणि उतरवणे ही सरकारची जबाबदारी नाही, असे म्हणणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत भोंग्यांबाबत चर्चा करून बाकीच्या संघटनांची देखील बैठक घेण्याची फट दिलीप वळसे पाटलांनी ठेवून दिली आहे…!! सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेण्याचे देखील वळसे-पाटील म्हणाले आहेत…!! म्हणजे सर्वपक्षीय बैठकीत घेतलेला निर्णय देखील अंतिम असणार नाही, हेच वळसे-पाटील यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. मात्र, कोणी कायदा हातात घेऊ नये कायदा हातात घेणे यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील द्यायला ते विसरलेले नाहीत.

पण त्यामुळेच संजय राऊत आणि दिलीप वळसे-पाटील यांनी भोंग्यांचा विषय राज्य सरकारांच्या असताना तो विषय वेगवेगळ्या ठिकाणी ढकलल्याचे स्पष्ट झाले आहे.

– उत्तर प्रदेशात मार्गदर्शक सूचना जारी

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड यांच्यासारख्या राज्य सरकारांनी त्यावर स्पष्टपणे मार्गदर्शक सूचना जारी केले असताना संजय राऊत आणि दिलीप वळसे-पाटील यांनी मात्र हा विषय एक प्रकारे अनुक्रमे केंद्राकडे आणि सर्वपक्षीय बैठकीकडे ढकलणे यातून ठाकरे – पवार सरकारची विशिष्ट मानसिकताही लक्षात येत आहे…!!

Sanjay Raut at the center; At the all-party meeting of Valse Patil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात