राजस्थानात शहरात गोपालनासाठी नियम; घरटी एकच गाय किंवा म्हशीला परवानगी; लायसेन्स काढण्याची सक्ती


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानात गोपलानासाठी नवे नियम जाहीर करून सरकारने अडचणी तयार केल्या आहेत. त्यात एका कुटुंबाला एक गाय किंवा म्हैस पाळता येणार आहे. पण त्यासाठी एक हजार रुपयाचे लायसेन्स काढण्याची सक्ती केली आहे. Rules for city rearing in Rajasthan; Permission allowed only one cow or buffalo in the nest; Forced removal of license



ही नियमावली सरकारने २१३ शहरात लागू केली आहे. हे नवे नियम जाचक असल्याचे गोपालन करणाऱ्यांनी सांगितले. याशिवाय नियमानुसार घरात १०० चौरस फूट अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. तेथे जनावरांना ठेवण्याची व्यवस्था करावी. लायसेन्सआठी वर्षाला सरकारला हजार रुपये द्यावे लागतील. जनावरे रस्त्यावर भटकताना दिसली तर १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. प्रत्येक गाईसाठी बिल्ला आवश्यक असून त्यावर सर्व तपशील लिहिलेला असावा. शेण साठवून ठेऊ नये त्याची विल्हेवाट शहराबाहेर करावी. शहरात रस्त्यावर चारा विकण्यास बंदी घातली आहे. जो कोणी विकला त्याला ५०० रुपयाचा दंड केला जाईल. विशेष म्हणजे दूध शहरात विकता येणार नाही. या नवीन नियमावली मुळे गोपालन करणे अवघड झाले आहे.

Rules for city rearing in Rajasthan; Permission allowed only one cow or buffalo in the nest; Forced removal of license

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात