Jahangirpuri bulldozer : जहांगीरपुरीतले “राजकीय पर्यटन”, पण दगडफेक आणि हिंसाचारानंतर नव्हे, तर बुलडोजर कारवाईनंतर!!


  • काँग्रेस – कम्युनिस्ट – तृणमूळ – ओवैसींची राजकीय पावले वळली जहांगीरपुरीकडे

दिल्लीच्या जहांगीरपुरीत हनुमान जयंतीला समाजकंटकांनी दगडफेक केली. आरोपींना कोर्टात नेताना मुख्य आरोपी मोहम्मद अन्सार याने पुष्पा स्टाइल मस्ती दाखविली… पण या दगडफेकीनंतर काँग्रेस – कम्युनिस्ट – तृणमूळ – ओवैसी यांची पावले जहांगीरपुरीकडे वळली नाहीत… तर त्यांची पावले जहांगीरपुरीकडे वळली, ती तिथल्या बुलडोजर कारवाईनंतर… Hanuman Jayanti in Jahangirpur, Delhi was stoned by miscreants

जहांगीरपुरीत उत्तर दिल्ली महापालिकेने काल सुमारे दीड तास ९ बुलडोजर चालवून डझनभर अतिक्रमणे हटवली. पण सुप्रीम कोर्टाने ही कारवाई लगेच थांबवली. पण याच दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत तिथे पोचल्या. त्यांच्या पाठोपाठ असदुद्दीन ओवैसी तिथे पोहोचले. हे दोन पक्षांचे दोन मोठे नेते तिथे पोहचल्यावर काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. अजय माकन दिल्लीत नव्हते, पण त्यांनी ट्विट करून आपण दिल्लीत नाही, पण उद्या म्हणजे आज जहांगीरपुरीत पोहोचू असे सांगितले होते.

त्यानुसार अजय माकन जहांगीरपुरीत आज गेले. पण ते एकटे गेले नाहीत. काँग्रेसच्या १६ नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन ते जहांगीरपुरीत पोहोचले. त्यांनी अतिक्रमण विरोधी बुलडोर कारवाई झालेल्या पीडितांची भेट घेतली. त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. आता यासंबंधीचा रिपोर्ट काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर करणार आहे.

पण मार्क्सवादी – ओवैसी आणि काँग्रेसचे नेते जहांगीरपुरीत पोहोचल्यानंतर तृणमूळ काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. जहांगीरपुरीत लवकरच तृणमूळ काँग्रेसचे फॅक्ट फाइंडिंग शिष्टमंडळ पाठवू, असे त्या पक्षाचे नेते सुगता राय यांनी जाहीर केले.

काँग्रेससह सर्व विरोधक जहांगीपुरीतील घटनांमुळे अस्वस्थ झाले खरे… पण ते हनुमान जयंतीच्या मिरवणूकीतील दगडफेकीमुळे आणि हिंसाचारामुळे नव्हे, तर अतिक्रमण विरोधी बुलडोजर कारवाईमुळे प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यातूनच या शिष्टमंडळांनी जहांगीरपुरीचा पोलिटिकल टुरिजम उरकून घेतला आणि यापुढेही घेणार आहेत.

Hanuman Jayanti in Jahangirpur, Delhi was stoned by miscreants

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात