वृत्तसंस्था
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिगप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. ते लवकरच जारी केले जाणार आहे. ed to sent summons to anil deshmukh and his son
देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून ईडीने गेले दोन दिवस झडती घेतली. त्यानुषंगाने नव्याने समन्स पाठवले जाणार आहे. महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ईडीचा देशमुखांसह कुटुंबीयांच्या मागे ससेमिरा सुरू आहे.
त्यांना आतापर्यंत ४ वेळा, तर मुलगा ऋषिकेश व पत्नी आरती देशमुख यांना अनुक्रमे दोन व एकवेळा चौकशीसाठी समन्स बजाविले. मात्र, तिघांनीही उपस्थित राहण्याचे टाळले आहे.
महत्तवाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App