BJP agitation today over allegations of recovery of Rs 100 crore by HM Anil Deshmukh

100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून राजकीय भूकंप, अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आज रस्त्यावर उतरणार भाजप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे.

माजी पोलीस आयुक्तांच्या या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. रविवारी सकाळी 11.30च्या सुमारास दादर पूर्व (रेल्वे स्टेशन) येथील स्वामीनारायण मंदिराजवळ भाजप आंदोलन करणार आहे. गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते येथे जमून निदर्शने करतील.

फडणवीस आक्रमक

तत्पूर्वी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांवरील गंभीर आरोपांवर आम्ही केंद्र सरकारच्या एजन्सीकडून सखोल चौकशीची मागणी करत आहोत. जर केंद्र सरकार या गोष्टीस सहमत नसेल तर कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. पत्रात केलेले आरोप पाहता गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बरखास्त करावे.भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, माजी मुंबई पोलीस आयुक्तांच्या वक्तव्यानुसार मुंबईत खंडणी चालू आहे आणि सचिन वाझे हे गृहमंत्र्यांचे एजंट होते. बिअर बारमधून व इतर ठिकाणांहून पैसे गोळा केले जात होते. अनिल देशमुख यांना आता हटवायला हवे.

राज ठाकरेंनीही केली राजीनाम्याची मागणी

भाजपनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केले की, ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र स्फोटक आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्वरित राजीनामा सादर करण्याची गरज आहे आणि त्याची उच्चस्तरीय सखोल चौकशी झाली पाहिजे.’काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी असा दावा केला आहे की, अँटिलिया प्रकरणात अटक करण्यात आलेले अनिल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांच्या या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे.

अँटिलिया प्रकरणात अटक केलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी हप्ते वसूल करण्यास सांगितले होते. अनिल देशमुख यांच्या वतीने सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

या पत्रात परमबीरसिंग यांनी म्हटले आहे की, क्राइम इंटेलिजन्स युनिटचा पदभार स्वीकारणारे सचिन वाझे यांना गेल्या काही महिन्यांत गृहमंत्र्यांनी अनेक वेळा त्यांच्या अधिकृत निवासस्थानी बोलावले होते. सचिन वाझे यांना वारंवार गृहमंत्र्यांसाठी पैसे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

त्याचवेळी या विषयावर अनिल देशमुख यांनी ट्विट केले की, परमबीर सिंग यांनी कायदेशीर कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी असे आरोप केले आहेत.

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*