विशेष प्रतिनिधी
कोलकता : शंभर दिवसांसाठी रोजगार योजनेअंतर्गत केवळ तृणमूल काँग्रेसशी जवळीक असलेल्या नागरिकांनाच रोजगार मिळेल, असा आदेश दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका सरपंचाने काढला आहे. त्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण तप्त झाले. इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षाने यावर जोरदार टीका केली आहे. Trinamool Congress, work from the employment scheme, everyone is amazed by the strange fatwa
भांगर येथे तृणमूल काँग्रेसला आयएसएफकडून पराभव पत्करावा लागला. अब्बास सिद्दीकी यांच्या पक्षाला मिळालेली ही एकमेव जागा ठरली. विजयी आमदार नौशाद सिद्दीकी यांनी सांगितले की, निर्वाचित प्रतिनिधी राजकीय भूमिका काहीही असली तरी सर्वांसाठी कार्य करतील.
भांगर तालुक्यातील भोगाली-दोन पंचायतीचे सरपंच मोदस्सर हुसेन यांनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्यावेळी आयएसएफसाठी काम केलेल्यांना आता रोजगार हवा असेल
तर त्यांनी सत्ताधारी पक्षाला शरण जावे. तेव्हा आमच्याकडून सर्व सुविधा घेऊन इतर पक्षांसाठी काम केलेल्यांचा त्याशिवाय विचार केला जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App