ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी नाटोची सदस्य राष्ट्रे सरसावली, वर्चस्ववादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

ब्रुसेल्स : चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी व हेकेखोर भूमिकेला कडाडून विरोध करण्याचे नाटोच्या सदस्य देशांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे. जागतिक व्यवस्था मोडून काढण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्यापासून जागतिक सुरक्षेला धोका आहे, असे नाटो संघटनेतील सदस्य देशांनी जाहीर केले आहे.NATO countries warns China

बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे ‘नाटो’च्या परिषदेत उत्तर अमेरिका आणि युरोपमधील तीस देशांचे प्रमुख सहभागी झाले होते. परिषदेनंतर संयुक्त निवेदनात चीनचा निषेध करण्यात आला. चीनला उघडपणे शत्रू म्हणण्याचे टाळले असले



तरी ‘नाटो’ देशांनी त्यांच्या दडपशाहीच्या आणि गोपनीय पद्धतीने लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली. सर्व सदस्य देशांच्या संरक्षणासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे ‘नाटो’ देशांचे धोरण असून त्यामध्ये अवकाशात होऊ शकणाऱ्या हल्ल्यांपासूनही संरक्षण करण्याच्या संयुक्त जबाबदारीचा समावेश करण्यात आला.

चीनविरोधात उघडपणे आघाडी घेण्यास जी-७ परिषदेप्रमाणे ‘नाटो’ परिषदेतही काही देशांनी विरोध दर्शविला. विशेषत: जर्मनीने दोन्ही परिषदांमध्ये चीनबाबत अतिशयोक्ती करण्याची गरज नसल्याची भूमिका मांडली.

NATO countries warns China

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात