पाकिस्तान ठरतोय गाढवांचा देश, चीनमुळे संख्येत विक्रमी वाढ

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानात गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी गाढवांच्या संख्येत लाखा लाखाने भर पडत आहे. पाकिस्तानात आता गाढवांची संख्या ५६ लाखांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे गाढवांच्या संख्येत पाकिस्तान जगात तिसरा मोठा देश ठरला आहे.Pakistan becoming donkeys country

२००१-२००२ पासून दरवर्षी गाढवांची संख्या एक लाखाने वाढत चालली आहे. याशिवाय उंट, घोडे, खेचरसह अन्य जनावरांच्या संख्येत होणारी वाढ मात्र तेरा वर्षांपासून स्थिर राहिली आहे. पाकिस्तानात २०२०-२१ या कालावधीत जनावरांची संख्या २१.३१ दशलक्षने वाढली. तत्पूर्वी २०१९-२० मध्ये २०.७ दशलक्ष संख्येने भर पडली होती.म्हशीची संख्या ४२.४ दशलक्षवर पोचली आहे. तसेच शेळ्यांची संख्या ८०.३ दशलक्षवर पोचली आहे.पाकिस्तान चीनला दरवर्षी ८० हजार गाढवांची निर्यात करते. त्याचा उपयोग मांस आणि अन्य कामासाठी केला जातो. त्याच्या कातडीचा उपयोग चीनमध्ये अनेक प्रकारे केला जातो.

गाढवांच्या कातडीपासून तयार झालेले जिलेटीनने अनेक प्रकारचे पारंपरिक औषधी तयार केली जातात. चीनच्या कंपन्यांनी पाकिस्तानात गाढवांच्या व्यापारासाठी लाखो डॉलर गुंतवणूक केले आहेत. पाकिस्तानात गाढवाच्या जातीनुसार किमती निश्चियत केल्या जातात

Pakistan becoming donkeys country