पाकिस्तानकडून संरक्षण बजेटमध्ये वाढ, तब्बल 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद

Pakistan increased its defense budget, allocated 6 percent more amount than last year

Pakistan increased its defense budget : पाकिस्तान सरकारने शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठी 8,487 अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यात वित्तीय तुटीचे लक्ष्य जीडीपीच्या 6.3 टक्के ठेवण्यात आले आहे. संरक्षण सेवांसाठी 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद मागील वर्षाच्या तुलनेत 6.2 टक्के जास्त आहे. Pakistan increased its defense budget, allocated 6 percent more amount than last year


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठी 8,487 अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यात वित्तीय तुटीचे लक्ष्य जीडीपीच्या 6.3 टक्के ठेवण्यात आले आहे. संरक्षण सेवांसाठी 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद मागील वर्षाच्या तुलनेत 6.2 टक्के जास्त आहे.

‘डॉन’च्या अहवालानुसार, सन 2022च्या अर्थसंकल्पातील एकूण अर्थसंकल्पीय खर्चाच्या संरक्षण सेवांवरील खर्च सुमारे 16 टक्के होता, तो मागील वर्षीच्या 18 टक्क्यांपेक्षा कमी आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तारिन यांनी हे बजेट सादर केले. कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.

विरोधकांचा अर्थसंकल्पाला विरोध

तारिन यांनी आपल्या भाषणाची सुरुवात असे म्हणत केली की येथे अनेक अडचणी आहेत पण या सरकारने अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पाऊल टाकले होते आणि आता ते प्रगती व समृद्धीकडे जात आहेत. विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ आणि पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी हे सभागृहात उपस्थित होते. मंत्र्यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. तत्पूर्वी, बिलावल यांनी शरीफ यांना संसदेच्या दालनात भेट दिली, यावेळी दोन्ही पक्ष एकत्रितपणे पीटीआयच्या बजेटला विरोध करण्याचे ठरले.

गततीन वर्षांत सरकारला अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. तारिन म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाही. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने आपल्या सशक्त आर्थिक धोरणांद्वारे चालू खात्यातील तूट २०२१ मध्ये सरप्लसमध्ये बदलली आहे.

जीडीपी वाढीचे लक्ष्य 4.8 टक्के

तारिन यांच्या भाषणावेळी विरोधकांनी डेस्क वाजवत “गो नियाजी गो!’च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजी सुरू असताना मंत्री म्हणाले की, सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचे लक्ष्य 4.8 टक्के ठेवले आहे. पुढील वर्षासाठी एकूण बजेट खर्च 8487 अब्ज पाकिस्तानी रुपये असून ते मागील वर्षाच्या 71366 अब्ज रुपयांच्या बजेटपेक्षा 19 टक्के अधिक आहे.

पुढील 10 दिवसांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पावरील चर्चा 14 जूनपासून सभागृहात सुरू होईल, त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी सभागृहा 28 जून रोजी मतदान करणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्प हे सिनेट किंवा उच्च सदनासमोर मांडले जाईल.

Pakistan increased its defense budget, allocated 6 percent more amount than last year

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात