ब्रिटनमध्ये आता मंकिपॉक्सचा संसर्ग आढळला, जाणून घ्या या विचित्र आजाराची लक्षणे आणि उपचार

UK Confirms Monkeypox outbreak Know About viral Infection symptoms and treatment

Monkeypox outbreak : ब्रिटनमध्ये कोरोना महामारी काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी आता एका नव्या रोगाची चाहुल लागली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळल्याचे समोर आले आहे. हा संसर्ग केव्हा वा कसा समोर आला याबाबत आरोग्यमंत्र्यांनी जास्त माहिती देण्यास नकार दिला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, सध्या संक्रमित व्यक्तीवर इंग्लंडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. UK Confirms Monkeypox outbreak Know About viral Infection symptoms and treatment


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना महामारी काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी आता एका नव्या रोगाची चाहुल लागली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळल्याचे समोर आले आहे. हा संसर्ग केव्हा वा कसा समोर आला याबाबत आरोग्यमंत्र्यांनी जास्त माहिती देण्यास नकार दिला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, सध्या संक्रमित व्यक्तीवर इंग्लंडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पब्लिक हेल्थ वेल्सने म्हटले आहे की, लोकांमध्ये हा रोग पसरण्याचा धोका ‘कमी’ आहे. एखाद्या व्यक्तीला परदेशात या विषाणूची लागण झाली असावी आणि नंतर रोग त्याच्याबरोबर राहणाऱ्या इतर व्यक्तींमध्ये पसरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

यूकेमध्ये मंकिपॉक्सच्या उद्रेकामुळे दहशत

पब्लिक हेल्थ वेल्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “बाहेरून आलेल्या मंकिपॉक्सच्या दोन आजारांची पुष्टी झाली आहे आणि पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि पब्लिक हेल्थ वेल्स नॉर्थ वेल्समध्ये उघडकीस आलेल्या दोन्ही केसेसचे परीक्षण सुरू आहे.” यूकेमध्ये मंकिपॉक्सची केवळ थोड्या प्रमाणात प्रकरणे आढळली आहेत, एनएचएस वेबसाइटनुसार, बहुतेक प्रकरणे आफ्रिकेत आढळून आली आहेत आणि ब्रिटनच्या मंकिपॉक्सच्या संसर्गाचा धोका खूपच कमी आहे. हा सामान्यत: एक सौम्य आजार आहे जो उपचार न करताच आपोआप बरा होतो. काही लोकांना अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात.

मंकीपॉक्सची लक्षणे कोणती?

मंकीपॉक्स झुनोटिक आहे आणि तो देवी रोगाच्या कुटुंबातीलच एक आहे. चिकनपॉक्सपेक्षा कमी तीव्र असला तरी लक्षणे सौम्य आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, मंकीपॉक्स विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजारात चेचकसारखी लक्षणे आढळतात, परंतु कमी गंभीर असतात. संसर्गाच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, मुरूम आणि वाढलेले लिम्फ नोड्स समाविष्ट आहेत. मानवांमध्ये हे प्रामुख्याने उंदीर किंवा माकड यासारख्या वन्य प्राण्यांद्वारे संक्रमित होते, जरी हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंतही पसरत असला, तरी यात मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. हा रोग उच्च तापमान, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, सुजलेल्या ग्रंथी, थंडी वाजून येणे, थकवा यापासून सुरू होते. मुरुम सामान्यत: प्रथम लक्षणे दिसल्यानंतर 1-5 दिवसानंतर दिसतात. शरीराच्या इतर भागामध्ये पसरण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसायला सुरू होतात.

मंकिपॉक्सवर उपचार काय?

सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोलने असे म्हटले आहे की, या आजारासाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही आणि मंकिफॉक्ससाठी कोणतीही लसदेखील विकसित केलेली नाही. तथापि, सिडोफॉव्हिर, एसटी -246 आणि व्हिग या इतर आजारांच्या लसीद्वारे याला नियंत्रित केले जाऊ शकते.

UK Confirms Monkeypox outbreak Know About viral Infection symptoms and treatment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती