तृणमूल कॉँग्रेसने सत्तेच्या उन्मादात एक महिन्यात केल्या २४ कार्यकर्त्यांच्या हत्या, मुलाला वाचविताना एका महिलेचाही मृत्यू


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २ मे रोजी तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविला. तेव्हापासून सुरू झालेल्या सत्तेच्या उन्मादात एक महिन्यात २४ भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली आहे.Trinamool Congress kills 24 activists in a month in power frenzy, kills woman while rescuing child


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २ मे रोजी तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविला. तेव्हापासून सुरू झालेल्या सत्तेच्या उन्मादात एक महिन्यात २४ भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने तृणमूल कॉँग्रेसला जोरदार आव्हान दिले होते. मात्र, तृणमूलच्या मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. मात्र, त्यांची कारकिर्द एक महिन्यातच भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्यांनी डागाळली गेली आहे. केवळ भाजपाचे कार्यकर्ते असल्यने त्यांची हत्या करण्यात आली.



 

६ जून रोजी जयप्रकार यादव यांच्यावर बॉँब टाकून त्यांची हत्या करण्यात आली. अनिल बर्मन या कार्यकर्त्याला जंगलात फाशी देण्यात आली. ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या मतदारसंघातील राजा सामंतो यांना अत्यंत निर्दयपणे मारहाण करून ठार करण्यात आले.

कुचबिहार जिल्ह्यातील सीतलकुची येथील धीरेन बर्मन यांचे अपहरण करून हत्या करण्यता आली. दमदम पार्क येथे प्रोसेनजीत दास या चाळीस वर्षीय कार्यकर्त्याला फाशी देऊन ठार मारण्यात आले.

निर्मल मंडल यांच्यावर भर रस्त्यात हल्ला करून मारण्यात आले. हुगळीमध्येही घनश्याम राणा यांच्यावर हल्ला करून ठार करण्यात आले. धर्मा मंडल यांना तर घरात घुसून ठार करण्यात आले. मालदा येथष तर १९ आणि २१ वर्षीय युवकांना फाशी देऊन निर्घृणपणे मारण्यात आले.

भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करणाºया अभिजित सरकार यांना अत्यंत क्रुरपणे मारण्यात आले. शोभा रानी मंडल या भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आपल्या मुलाला वाचविताना मृत्यूमुखी पडल्या. अनेक कार्यकर्त्यांना जंगलामध्ये नेऊन फाशी देण्यात आले. पोलीसांनी या प्रकरणी आत्महत्येचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, त्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे.

Trinamool Congress kills 24 activists in a month in power frenzy, kills woman while rescuing child

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात