नागपूरमध्ये ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचा उत्साह; फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंच्या हस्ते लोगोचे अनावरण

‘Run for Unity’ marathon

विशेष प्रतिनिधी

नागपूर : भारताचे लोहपुरुष आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रन फॉर युनिटी मॅरेथॉन’च्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

ही मॅरेथॉन ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल मैदान, लकडगंज, नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून एकता, बंधुभाव आणि सामाजिक सहभागाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.



मान्यवरांची उपस्थिती

लोगो अनावरण कार्यक्रमाला आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय एकतेचा संदेश

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘रन फॉर युनिटी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यावर भर दिला जाणार आहे.

Enthusiasm for ‘Run for Unity’ marathon in Nagpur; logo unveiled by Fadnavis, Gadkari, and Bawankule.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात