स्मार्टफोनवरील GST कमी होणार? मोबाईलच्या किमती घटण्याची शक्यता; 12 सप्टेंबरच्या बैठकीकडे लक्ष

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांकडून मोबाईल खरेदीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. त्यामुळे मंदावलेल्या स्मार्टफोन बाजारपेठेला पुन्हा चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 12 सप्टेंबर रोजी GST कौन्सिलची 57वी बैठक होणार असून, या बैठकीत स्मार्टफोनवरील वस्तू आणि सेवा कराबाबत (GST) चर्चा होण्याची शक्यता आहे.GST on smartphones

सध्या देशात स्मार्टफोनच्या खरेदीवर 18 टक्के GST आकारला जातो. स्मार्टफोन उत्पादकांकडून हा दर कमी करून 5 टक्के करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. ही मागणी मान्य झाल्यास ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना मोठा दिलासा मिळू शकतो आणि मोबाईल हँडसेटच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

मेमरी चिपच्या किमतीत मोठी वाढ

गेल्या वर्षभरात स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरी चिप्सच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काही अहवालांनुसार, मेमरी चिपच्या दरात जवळपास 400 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम स्मार्टफोनच्या उत्पादन खर्चावर झाला असून, अनेक मॉडेल्सच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले जाते.

किमती वाढल्याने ग्राहकांकडून नवीन स्मार्टफोन खरेदीचे प्रमाण कमी झाले असून, त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांकडून GST दरात कपात करण्यासाठी सरकारकडे मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.



GST 18 टक्क्यांवरून 5 टक्के होणार?

स्मार्टफोनवरील GST 18 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला जातो का, याकडे आता मोबाइल उद्योगासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि GST कौन्सिलच्या बैठकीच्या अध्यक्ष निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

मात्र, GST दर 5 टक्के करण्याचा निर्णय निश्चित झाला आहे, असे सध्या म्हणता येणार नाही. 12 सप्टेंबरच्या बैठकीत याबाबत प्रत्यक्ष निर्णय झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा मिळणार?

आगामी काळात देशात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. या काळात स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ग्राहक वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ होते. त्यामुळे स्मार्टफोनवरील GST कमी झाल्यास कंपन्यांना विक्री वाढवण्यास मदत होऊ शकते, तसेच ग्राहकांनाही तुलनेने कमी किमतीत मोबाईल खरेदी करता येऊ शकतो.

दरम्यान, सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या GST कौन्सिलच्या 56व्या बैठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील कररचनेत मोठे बदल करण्यात आले होते. GST चे विद्यमान चार स्लॅब कमी करून दोन प्रमुख स्लॅब करण्यात आले होते. तसेच जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील GST मध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते.

आता 12 सप्टेंबरच्या 57व्या GST कौन्सिल बैठकीत स्मार्टफोनवरील GST बाबत काय निर्णय होतो, याकडे देशभरातील ग्राहक आणि मोबाईल उद्योगाचे लक्ष लागले आहे.

Will GST on smartphones be reduced? Possibility of a drop in mobile prices.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात