ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का! माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी

Vishakha Rau

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाबाबतच्या प्रकरणात कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेला आदेश कायम ठेवत राऊत यांचे अपील फेटाळण्यात आले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठा धक्का बसला आहे.

विशाखा राऊत यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान देत कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. मात्र, अपील प्राधिकरणाने त्यांचे म्हणणे अमान्य करत मूळ समितीचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित जात प्रमाणपत्र आदेश प्राप्त झाल्यापासून २५ दिवसांच्या आत पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राऊत यांनी दाखल केलेले स्थगिती आणि अंतरिम अर्जही निकाली काढण्यात आले आहेत.

या प्रकरणात प्रिया सदानंद सरवणकर गुरव ऊर्फ प्रिया अतुल सरवणकर गुरव यांचा प्रतिवादी म्हणून उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिकेतील २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशातील निर्देशांच्या अधीन राहून हा निर्णय देण्यात आल्याचे आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय वळण घेते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Konkan Divisional Commissioner rejects Vishakha Raut’s appeal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात