नेपाळच्या महापुरातून महाराष्ट्रातील १४३ भाविकांची सुखरूप सुटका; मायदेशी परतले

Nepal floods 

विशेष प्रतिनिधी

मुंबई: नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागाला तडाखा देणाऱ्या भीषण महापुरात महाराष्ट्रातील १४३ भाविकांची सुरक्षित सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कैलास मानसरोवर यात्रेहून परतणारे ३७ भाविक मुंबईत पोहोचले आहेत, तर काठमांडूमध्ये अडकलेले नागपूरचे १०६ भाविक भारतात दाखल झाल्यानंतर आपल्या घराकडे रवाना झाले आहेत. Nepal floods

या महापुरात नेपाळमध्ये ६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास तीन हजार जण बेपत्ता असल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. मृत आणि बेपत्ता नागरिकांची संख्या अद्याप बदलत असून दुर्गम भागांतील शोधकार्य सुरू आहे. जखमींवर काठमांडूसह विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. Nepal floods



मुख्यमंत्र्यांचा तातडीने पुढाकार

नेपाळ आणि तिबेटमध्ये महाराष्ट्रातील भाविक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत मागितली. त्यानंतर भारतीय यंत्रणा, नेपाळ प्रशासन, बिहार सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात समन्वय साधण्यात आला. Nepal floods

नागपूरचे १०६ भाविक काठमांडूमध्ये अडकले होते. त्यांच्या सुटकेसाठी स्थानिक प्रशासनाकडून चार खासगी बसची व्यवस्था करण्यात आली. सर्व भाविकांना नेपाळमधून सुरक्षितपणे सीतामढीमार्गे बिहारमध्ये आणण्यात आले. तेथून बिहार सरकारच्या सहकार्याने त्यांना रात्री पाटणा येथे नेण्यात आले. Nepal floods

१०२ भाविक रेल्वेने नागपूरकडे

सुटका करण्यात आलेल्या १०६ भाविकांपैकी चार जण विमानाने दिल्लीला पोहोचले. तेथून ते केरळ एक्स्प्रेसने नागपूरकडे रवाना झाले.

उर्वरित १०२ भाविक शनिवारी सकाळी ७.३६ वाजता पाटणा येथून रेल्वे क्रमांक १७६०९ ने नागपूरच्या दिशेने रवाना झाले. सर्व प्रवाशांची प्रकृती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. संकटाच्या काळात मिळालेल्या मदतीबद्दल भाविकांनी केंद्र आणि राज्य सरकारसह बचावकार्यात सहभागी यंत्रणांचे आभार मानले.

सागामध्ये अडकलेल्या ३७ भाविकांचीही सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतत असताना महाराष्ट्रातील ३७ भाविक तिबेटमधील सागा येथे अडकले होते. या गटात ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली येथील १७ पुरुष आणि २० महिलांचा समावेश होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधल्यानंतर या भाविकांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. त्यांना सागा येथून न्यालम तपासणी नाक्यामार्गे काठमांडूला आणण्यात आले. त्यानंतर ते विमानाने मुंबईकडे रवाना झाले.

भाविकांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी नगरसेवक विनोद शेलार उपस्थित होते.

एकीकडे भाविकांचे गट सुरक्षित परतत असताना मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्यासह कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या ६१ जणांच्या गटाशी संपर्क होऊ शकलेला नसल्याने चिंता वाढली आहे.

हिंदुजा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण वैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. आनंद देशपांडे आणि नानावटी मॅक्स रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. गायत्री देशपांडे यांचा या गटात समावेश आहे.

डॉ. देशपांडे दाम्पत्य ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या प्रवास संस्थेमार्फत यात्रेला गेले होते. बुधवारी सकाळी ८.२८ वाजता त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर भ्रमणध्वनी आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यांचे शेवटचे ज्ञात ठिकाण नेपाळ-तिबेट सीमेवरील ग्यिरोंग बंदराजवळ असल्याचे वृत्त आहे.

दळणवळण व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याने संपर्क तुटलेले सर्व जण संकटात सापडले आहेत, असे लगेच निश्चित करता येणार नाही. मात्र, त्यांच्या ठिकाणाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसल्याने कुटुंबीयांची चिंता कायम आहे.

शोधकार्य युद्धपातळीवर

डॉ. देशपांडे दाम्पत्य आणि संपर्क तुटलेल्या अन्य यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि नेपाळ प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे.

नेपाळ सरकारची विशेष बचाव पथकेही दुर्गम भागांमध्ये रवाना झाली आहेत. मुसळधार पाऊस, वाहून गेलेले पूल, उद्ध्वस्त झालेले रस्ते, चिखल आणि खंडित दूरसंचार व्यवस्थेमुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. भारतीय नागरिकांचा शोध घेणे आणि अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलविणे याला प्राधान्य देण्यात आले आहे.

143 Maharashtra pilgrims safely rescued from Nepal floods

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात