विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी, पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून याचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीची बदलती दिशा पाहता छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, ओडिशा, आणि विदर्भालगत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकण भागांमध्ये जास्त पावसाचा अंदाज आहे. तर पुणे आणि मुंबईत ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. उर्वरित भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
यंदा ‘एल निनो’मुळे सुरूवातीपासून सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, जुलै महिन्यात पुणे आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत 119 वर्षाचा विक्रम मोडित काढला.
बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे मोसमी वाऱ्यांवर परिणाम झाला. यामुळे घाट परिसरातील पावसाचा जोर वाढला आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा वेग काहीसा मंदवला आहे.अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App