विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) २४व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना नेहमीच्या २ हजार रुपयांऐवजी ४ हजार रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच हा हप्ता राखी पौर्णिमेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
या दाव्यामुळे देशभरातील पीएम किसान लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, केंद्र सरकारने या व्हायरल दाव्याचे खंडन केले असून शेतकऱ्यांनी अशा माहितीवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे.
४ हजार रुपयांचा हप्ता मिळणार का?
सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता २ हजार रुपयांऐवजी ४ हजार रुपये असणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही वाढीव रक्कम दिली जाणार असल्याचेही व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
लाभार्थ्यांनी योजनेशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि हप्ता मिळण्यात अडचण आल्यास संपर्क साधावा, असे आवाहनही या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
दावा: रक्षाबंधनच्या निमित्तानं देशातील शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेअंतर्गत २४ वा हप्ता म्हणून ४ हजार रुपये दिले जाणार असल्याचा दावा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या एका व्हिडिओमधून करण्यात आला आहे. ❌ हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं तयार करण्यात… pic.twitter.com/GbkoEEAvVY — DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 20, 2026
दावा: रक्षाबंधनच्या निमित्तानं देशातील शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेअंतर्गत २४ वा हप्ता म्हणून ४ हजार रुपये दिले जाणार असल्याचा दावा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या एका व्हिडिओमधून करण्यात आला आहे.
❌ हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं तयार करण्यात… pic.twitter.com/GbkoEEAvVY
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 20, 2026
PIB Fact Checkने केला दावा खोटा असल्याचं स्पष्ट
या व्हिडिओची केंद्र सरकारच्या Press Information Bureau (PIB) Fact Check कडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पीएम किसानचा २४वा हप्ता ४ हजार रुपयांचा मिळणार असल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
PIB Fact Checkनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला संबंधित व्हिडिओ AI-Generated असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने पीएम किसानच्या २४व्या हप्त्याची रक्कम वाढवून ४ हजार रुपये करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
२४वा हप्ता कधी मिळणार?
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून २०२६ रोजी पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता वितरित केला होता. मात्र, त्यानंतरच्या २४व्या हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख किंवा वाढीव रकमेची घोषणा करण्यात आलेली नाही.
त्यामुळे राखी पौर्णिमेला ४ हजार रुपयांचा हप्ता मिळणार, या दाव्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवणे योग्य ठरेल.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
सोशल मीडियावर पीएम किसान योजनेबाबत अनेकदा अपूर्ण किंवा चुकीची माहिती व्हायरल होत असते. त्यामुळे हप्त्याची तारीख, रक्कम किंवा पात्रतेशी संबंधित माहिती मिळवताना केवळ अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवावा. संशयास्पद व्हिडिओ किंवा लिंकवर क्लिक करून वैयक्तिक अथवा बँकिंग माहिती शेअर करू नये.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App