विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘विकसित भारत 2047’चा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. यावेळी त्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ‘शक्ती की सप्तधारा’ची घोषणा केली. उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंतच्या सात क्षेत्रांवर विशेष भर देण्याचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या 5 ते 7 वर्षांत देशाला नवी गती, नवी उंची आणि नवी उद्दिष्टे गाठण्यासाठी या सात शक्तींचा उपयोग केला जाणार आहे. राष्ट्र उभारणीत युवकांच्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.
काय आहेत ‘शक्ती की सप्तधारा’?
1. उत्पादन क्षेत्र : जागतिक बाजारपेठेत भारताला आघाडीवर नेण्यासाठी खर्च, गुणवत्ता आणि उत्पादनाचा विस्तार यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन मोदींनी केले. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचा संदेशही त्यांनी दिला.
2. कृषी आणि अन्न प्रक्रिया : भारतीय कृषी उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवण्यावर भर देण्यात येणार आहे. नव्या मुक्त व्यापार करारांमुळे जागतिक बाजारपेठेतील संधी वाढल्याचेही मोदींनी सांगितले.
3. तंत्रज्ञान आणि नवोपक्रम : डिजिटल तंत्रज्ञान, दळणवळण, नवकल्पना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने अधिक वेगाने पुढे जाण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
4. गती-शक्ती आणि कनेक्टिव्हिटी : वेगवान रेल्वे, आधुनिक महामार्ग, विमानतळ, अंतर्गत जलमार्ग, बंदरे आणि मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून देशातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
5. संरक्षण उत्पादन : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासोबतच भारताने जगासाठी संरक्षण साहित्याचा प्रमुख पुरवठादार बनण्याचे लक्ष्य ठेवावे, असे मोदी म्हणाले. ड्रोन आणि अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानावरही त्यांनी भर दिला.
6. हरित आणि नील अर्थव्यवस्था : अक्षय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित उत्पादन आणि ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारतासमोर मोठ्या संधी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
7. भारताची सॉफ्ट पॉवर : योग, आयुर्वेद, समग्र आरोग्य, हस्तकला, संस्कृती, चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल कंटेंट आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताची जागतिक ओळख आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
Gen-Z साठी मोठी घोषणा; 1 कोटी तरुणांना AI प्रशिक्षण
पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांसाठी मोठी घोषणा केली. येत्या वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. AI क्षेत्रात भारतीय तरुणांनी जगाचे नेतृत्व करावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग
यासोबतच विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंगचे नेटवर्क उभारण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. कोचिंगची वाढती स्पर्धा आणि त्यासाठी पालकांवर येणारा आर्थिक-सामाजिक दबाव कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
‘विकसित भारत’ाच्या वाटचालीत देशातील युवा शक्ती ही सर्वात मोठी प्रेरक शक्ती असल्याचे सांगत पंतप्रधानांनी युवकांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागाचे आवाहन केले.नवी दिल्ली : देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘विकसित भारत 2047’चा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. यावेळी त्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ‘शक्ती की सप्तधारा’ची घोषणा केली. उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंतच्या सात क्षेत्रांवर विशेष भर देण्याचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.
‘विकसित भारत’ाच्या वाटचालीत देशातील युवा शक्ती ही सर्वात मोठी प्रेरक शक्ती असल्याचे सांगत पंतप्रधानांनी युवकांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App