काॅक्राेच जनता पार्टी जाणून घेणार क्या बाेलती पब्लिक, अभिजित दिपके यांची राष्ट्रव्यापी माेहीमेची घाेषणा

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : काॅक्राेच जनता पार्टी ‘क्या बोलती पब्लिक’ ही राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या जाणार असल्याचे अभिजित दिपके यांनी सांगितले. युवकांचे शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महागड्या शिक्षणामुळे पालकांवर पडणारा आर्थिक भार हे सीजेपीच्या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. Cockroach Janata Party

सीजेपीच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर संस्थापक अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाच्या पुढील वाटचालीची रूपरेषा जाहीर केली. देशातील शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांना परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला. लहान मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांची फी भरावी लागत असल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडत ममीनस. न्यायव्यवस्था आणि माध्यमांवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे.



धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होणे हे आंदोलनाचे मोठे यश असल्याचा दावा करत दिपके म्हणाले, देशातील भीतीचे वातावरण कमी होत असून नागरिक आता रस्त्यावर उतरून प्रश्न विचारू लागले आहेत. आम्ही महापुरुषांच्या विचारांवर चालत लोकांचा आवाज देशभर पोहोचवण्याचे काम करू, .

जंतर-मंतरवरील आंदोलनाला मिळालेला पाठिंबा केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता, असे दीपके यांनी स्पष्ट केले. “सध्या देशातील राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, शिक्षण व्यवस्था आणि निवडणूक आयोग यांसारख्या सर्वच महत्त्वाच्या संस्थांवरून जनतेचा विश्वास उडाला आहे. लोकांच्या मनात असलेला हा राग जंतर-मंतर, बंगाल, मुंबई आणि चेन्नईसह देशभरात दिसून आला.”

सीजेपी राजकीय पक्ष स्थापन करणार का? या प्रश्नावर दीपके यांनी स्पष्ट केले की, “देशाला सध्या आणखी एका राजकीय पक्षाची गरज नसून एका भक्कम ‘दबावगटाची’ गरज आहे. आम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, तर प्रेशर ग्रुप म्हणूनच यापुढे काम करू.”

Cockroach Janata Party to Launch Nationwide ‘Kya Bolti Public’ Campaign, Announces Abhijit Dipke

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात