CJP च्या आंदोलनात जंतर – मंतरवर नेमके हजर लोक किती??, आणि त्यात गुन्हेगार समाजकंटक घुसलेत किती??; पोलिसांनी जारी केला आकडा!!

नाशिक : नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने उभारलेले आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी नेते शिरले. हे सगळे नेते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अडून राहिले. त्यांनी दोन दिवस दिल्लीच्या काही भागांमध्ये गदारोळ केला. याच दरम्यान सोनम वांगचूकने उपोषण सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दोनदा संबोधित केले. दोन मंत्र्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. CJP

– मोदी सरकारची फास्ट ट्रॅक कारवाई

पण त्याच वेळी मोदी सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. नीट परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या आरोपींवर खटला चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले. त्या कोर्टात सुनावणी सुरू केली. सरकारने सुप्रीम कोर्टाचे कार्ड एक्टिव्हेट केले. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे तब्बल ४७ अधिकारी बडतर्फ केले. त्यांच्यावर फौजदारी खटला चालवायची कायदेशीर कारवाई सुरू केली.



पण या दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी देशभरात आंदोलन फैलावण्याची घोषणा केली. लगेच हे आंदोलन देशभर फैलावले नाही. पण माध्यमांनी हे आंदोलन उचलून धरले.

– वाचा नेमकी आकडेवारी

या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आंदोलनाची वास्तव आकडेवारी जाहीर केली. दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत आणि १५ एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात सुमारे ६५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जंतर – मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सरासरी १०,००० लोक उपस्थित आहेत आणि तिथे ३,००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ‘फेशियल रिकग्निशन सिस्टम’ (FRS) कॅमेऱ्यांच्या मदतीने दिल्ली पोलीस जंतर – मंतरवर येणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत अशा २००० हून अधिक लोकांची ओळख पटवली आहे, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि जे जंतर – मंतरवर आले होते, असे दिल्ली पोलीसांच्या सूत्रांनी सांगितले.

Exactly how many people were present at the CJP protest at Jantar Mantar?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात