एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना केले “मुख्यमंत्री”!!

नाशिक : संजय राऊत यांनी त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत आजपर्यंत केलेली सगळी भाकिते खोटी ठरली असताना सुद्धा आज त्यांनी धडाक्याने नवे राजकीय भाकित केले. महाराष्ट्रात लवकरच फार मोठी राजकीय उलथापालथ घडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चंद्रशेखर बावनकुळे यांची शिफारस करून त्यांना मुख्यमंत्री करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. पण एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणूनच राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या पटावर आणल्याचे “राजकीय रहस्य” त्यांनी स्वतः न सांगताच उघडकीला आले. Sanjay Raut

शरद पवार – एकनाथ शिंदे भेटीवर संताप

शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळातल्या दालनात जाऊन आमदारांची बैठक घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा वाढल्याचा “साक्षात्कार” संजय राऊत यांना झाला होता. त्याबद्दल त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केला होता. शरद पवारांची मूळातच कुठली राजकीय विश्वासार्हता नसताना त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी झाल्याचा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे राज्याच्या राजकारणात पेल्यातले वादळ आले होते. या वादळात अनेक जण हेलपाटून गेले.



पेल्यातले वादळ

पण ते पेल्यातले वादळ संपल्यानंतर संजय राऊत यांनी आज नवा दावा करून पुन्हा पेल्यातलेच वादळ निर्माण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात लवकरच अर्थमंत्री पद दिले जाईल आणि त्यांच्या जागी महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री केले जाईल. बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतः फडणवीसच करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यासाठी त्यांनी माझा अंदाज आणि माझे आकलन, असे शब्द सुद्धा वापरले.

एकनाथ शिंदेंच्या पायात पाय

पण, संजय राऊत यांनी हे सगळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत, यासाठी केले. जणू काही संजय राऊत यांनी ठरविले आणि भाजपच्या श्रेष्ठींनी ऐकले, असाच त्यांनी आव आणला. पण काही पत्रकारांनी प्रतिप्रश्न करताच आपण त्यांच्या पक्षातला निर्णय घेत नाही म्हणजे भाजप मधला निर्णय घेत नाही, असे सांगून राऊत मोकळे झाले. तरीसुद्धा एकनाथ शिंदेंच्या पायात पाय घालण्याचे त्यांचे प्रयत्न लपून राहिले नाहीत.

Sanjay Raut has made Chandrashekhar Bawankule the “Chief Minister” to prevent Eknath Shinde from becoming Chief Minister again.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात