विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या अपघातामागे घातपात असल्याची शंका व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तपासाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण करणार असलेला खुलासा आश्चर्यकारक असेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
रोहित पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, रामदास कदम यांनी नेमके काय आरोप केले, हे आपण ऐकलेले नाही. मात्र काही लोकांनी फोन करून अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणात सुनील तटकरे यांचे नाव जोडल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने व्हायला हवा, त्या पद्धतीने होत नसल्याची आपली तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासाच्या दिशेवर रोहित पवारांचे प्रश्न
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या अपघातामागे घातपात असल्याची शंका व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तपासाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण करणार असलेला खुलासा आश्चर्यकारक असेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
रोहित पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, रामदास कदम यांनी नेमके काय आरोप केले, हे आपण ऐकलेले नाही. मात्र काही लोकांनी फोन करून अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणात सुनील तटकरे यांचे नाव जोडल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने व्हायला हवा, त्या पद्धतीने होत नसल्याची आपली तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App