पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क; महाराष्ट्रातल्या ११२ व्यक्ती ATS च्या रडारवर; अनेक शहरांमध्ये छापे!!

वृत्तसंस्था

मुंबई : पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी काही व्यक्तींचे कथित सोशल मीडिया संबंध असल्याच्या प्रकरणाचा तपास करत असताना, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) राज्यभरातील अनेक ठिकाणी छापे घालून शोधमोहीम राबवत आहे. Maharashtra Anti-Terrorism

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर येथे छापे टाकले जात आहेत. या सुरू असलेल्या तपासादरम्यान १०० हून अधिक व्यक्ती एटीएसच्या रडारवर असल्याचे समजले.

– ११२ व्यक्तींची पटली ओळख

या संदर्भात एटीएसने स्पष्ट खुलासा केला. या खुलाशात ATS ने सांगितले, की “महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) १० जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात, एटीएसने महाराष्ट्रभरातील आपल्या १४ युनिट्सच्या माध्यमातून एकूण ११२ व्यक्तींची ओळख पटवली आहे. या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे, त्यांच्या लपून बसलेल्या ठिकाणांची खातरजमा करून त्यांची चौकशी केली जात आहे. शहजाद भट्टी हा सोशल मीडियाचा वापर करून या सगळ्या तरुणांना राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी चिथावणी देत होता, या संशयावरून ही कारवाई केली जात आहे.”

The Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) has initiated an inquiry

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात