मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर विरोधकांचा फुलटॉस; फडणवीसांचा षटकार; बाकीच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गमावली संधी!!

नाशिक : मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर विरोधकांचा फुलटॉस; देवेंद्र फडणवीसांचा षटकार; बाकीच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गमावली संधी!!, हेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. विरोधकांनी फडणवीस सरकारला खऱ्या अर्थाने कधी घेरलेच नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हे विषय विरोधकांनी उचलले, पण त्याचा सरकारला टोचणारा परिणाम साधू शकले नाहीत. उलट विरोधक या ना त्या कारणाने सत्ताधारी नेत्यांना भेटत राहिले‌. त्यामुळे फडणवीस सरकारचे फावले. भेटीगाठींमध्ये शरद पवार सुद्धा मागे राहिले नाहीत.

या सगळ्या राजकारणात विरोधकांनी फक्त मिसिंग लिंकचा मुद्दा लावून धरला. पण तो लावून धरताना विरोधकांचाच तोल गेला. त्यांनी खोट्या माहितीच्या आधारे सरकारला जाब विचारला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली आणि त्यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.
पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावला. ते जर स्टँड अप कॉमिडिअनच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँड अप कॉमेडिअनला मार्केट राहिलं नसतं, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला.



उद्घाटनादरम्यान अवघ्या दोन महिन्यातच कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी काही भाड्याचे टट्टू पैसे घेऊन कनेक्टिंग लिंकबाबत सोशल मीडियावर लिहित होते. महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही, असा इशाराही दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावरुनही विरोधकांनी टिका केली होती. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान उत्तर दिले.

– देवेंद्र फडणवीस म्हणाले :

– परवा मी विधानसभेत भाषण केल्यानंतर कित्येक लोकांना भाषणची मिरची लागली. पण मी स्पष्ट सांगितले की कनेक्टिंग लिंकवरील पूल, केबल स्टेट ब्रिज आहे. जगातील सगळ्यांत मोठे टनेल आहेत. त्यावर एकही तडा गेलेला नाही. काहीही नुकसान झालेले नसताना ७००० कोटी पाण्यात गेले, असे विरोधक म्हणाले. हा माझा अपमान आहे का??, हा महाराष्टाचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणे, अफवा पसरविणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

– परवा मी मी बोलता बोलता हिंदीत बोललो भाडे की टट्टू म्हणालो. काही लोकांना त्यांचं ही दुःख झाले. म्हणून नानाभाऊ मी त्याचा आभ्यास केला. मी माझं वाक्य मागे घेतो आणि त्याला सुस्कृंतपणे भाटकगदर्भ बोलतो. तरीही कोणाला समजलं नसले तर सुपारीबाज बोलतो.

– स्टँड अप कॉमेडियन मार्केट

– मी एक वाक्य हिंदीत बोललो. पण ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, पण त्यांच्याऐवजी दुसऱ्यांनाच मिरची लागली. पण आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले, हिंदीत का बोलले, पण मी भाषण तर मराठीतच केले होते. पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत. राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आम्हाला आनंद आहे, की ते राजकारणात आहेत. ते जर स्टँड अप कॉमिडिअनच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँड अप कॉमेडिअनला मार्केट शिल्लक राहिले नसते!!

Opposition serves up a ‘full toss’ on the ‘missing link’ issue; Fadnavis hits a six.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात