Rohit Pawar : ‘NEET’ फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, गुजरातमधून 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohit Pawar देशात सध्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यातच आता आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ परीक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली होती, तिचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा दावा पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. जर ही गोष्ट खरोखरच सत्य असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.Rohit Pawar

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, नीट पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील 3 दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे. तपास यंत्रणांनी या संदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामागील रॅकेट उघडकीस आणावे, अशी विनंती पवारांनी केली आहे. तसेच त्यांनी यासोबत पेपरफुटी संदर्भात पुढे आलेले स्क्रीन शॉट, मेल, संभाषण या सगळ्याची एक लिंक देखील त्यांनी ट्विट केली आहे.Rohit Pawar

आमदार रोहित पवार यांनी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही कागदपत्रे आणि एक ईमेल ट्विट करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. देशात आधीच ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारांवरून मोठे रणकंदन माजले असून, यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजीनाम्याची वेळ ओढवली आहे. अशातच आता फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा नवा आरोप समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar Alleges NEET Re-Exam Paper Leak From Gujarat 3 Days Prior

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*

    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात