Abhijit Deepke : सीजेपी संस्थापकाचा इशारा- विद्यार्थ्यांनी प्रधानांचा राजीनामा घेतला, सरकार लाइनवर आले नाही, तर तेसुद्धा बदलतील

Abhijit Deepke

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर :Abhijit Deepke   राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशातील युवकांनासोबत घेऊन विशेषतः जेन-झी पिढीला सोबत घेत मोठे आंदोलन उभारले होते. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि यश आले. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनंतर अभिजीत दीपके महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत.Abhijit Deepke

विमानतळावर उतरल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके म्हणाले, आज 40 दिवसांनंतर आणि एवढ्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो आहे, याचा मला खूप आनंद आहे. जेव्हापासून मी भारतात आलो तेव्हापासून आंदोलनच सुरू होते. त्यानंतर या आंदोलनाला यश आले आहे, देशातील विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. आज घरी येतोय, याचा आनंद होत आहे. आम्ही प्रधानांचा राजीनामा घेतला आहे. सरकारला जाग आली नाही, तर विद्यार्थी सरकार सुद्धा बदलतील, असा इशाराही त्यांनी दिला.Abhijit Deepke



पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की सरकारने आता सुधरावे. 20 जुलैला जे तुम्ही विद्यार्थ्यांचे रक्त वाहिले, ते अतिशय वाईट होते. त्यानंतरही तुमचे मन भरले नाही. वेगवेगळ्या राज्यात ते विद्यार्थ्यांना घरी जाऊन त्रास देत आहेत. ते विद्यार्थी काही आतंकवादी नाही. ते या देशाचे भविष्य आहे. आज तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे, सरकार लाइनवर आले नाही, तर हे विद्यार्थी हे सरकार सुद्धा बदलतील, असा इशारा दिपके यांनी दिला आहे.

आम्हाला त्याची काळजी लागलेली असायची- अभिजीत दीपकेंचे वडील

दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या विमानतळावर आगमनापूर्वी अभिजीतच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्हाला त्याची काळजी लागलेली असायची. आता तो सुखरूप येत आहे. आणि त्याच्या आईने त्याला गुरु म्हटले आहे, आता त्याच्या आईने म्हटले म्हणजे आहे. त्याने स्वतःचा जॉब देशासाठी सोडून दिला, या देशाच्या युवकांसाठी त्याने आंदोलन केले. आम्हाला एकदा धमकी सुद्धा आलेली होती. पण ते एकदाच झाले, त्यानंतर असे काही घडले नव्हते.

आता तो आमचा गुरू झालाय- अभिजीतची आई

अभिजीत दीपके घरी येणार हे समजल्यावर अभिजीतची आईने माध्यमांना प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच अभिजीत घरी येत आहे. हा दिवस असाच कसा निवडला गेला, हेही आम्हाला माहिती नाही. पण योगायोग खूप सुंदर आहे. आधी आम्ही त्याचे आई-वडील होतो, पण आता तो आमचा गुरू झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी त्याने जे काम केलं, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने संघर्ष केला, त्यामुळे तो आमच्यासाठी गुरूसमान आहे.

Abhijit Deepke Warns Government in Chhatrapati Sambhaji Nagar Over NEET Protests

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात