Trump’s : सौदीसह 4 आखाती देशांचा ट्रम्प यांना नकार, म्हणून ऑपरेशन इराण रोखले, ट्रम्प यांचा 24 तासांत मोहिमेवरून यू-टर्न

Trump’s

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन डीसी : Trump’s अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्धच्या युद्धात एकटे पडत चालले आहेत. होर्मुझमध्ये इराणविरुद्धचे ऑपरेशन ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ २४ तासांत मागे घेण्यामागे आखाती देशांचा नकार हे कारण होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाचे प्रिन्स मो. बिन सलमान (एमबीएस) यांनी अमेरिकेला आपला एअरस्पेस आणि एअरबेस देण्यास नकार दिला.Trump’s

एमबीएस यांनी याला ट्रम्प यांचा एकतर्फी निर्णय म्हटले आहे. याच धर्तीवर कुवेत, जॉर्डन आणि ओमाननेही नकार दिला आहे. युद्धाच्या वेळी अमेरिकन लष्कर मित्र देशाकडून एबीओ परवानगी घेते. अ‍ॅक्सेस (पोहोच), बेसिंग (बेसमधून टेक ऑफ-लँडिंग) आणि ओव्हरफ्लाइट (एअरस्पेसचा वापर).Trump’s

ट्रम्प उत्तराच्या प्रतीक्षेत…इराणने होर्मुझमध्ये जहाजांसाठी ४० प्रश्नांचा फॉर्म जारी केला

इराण प्रस्तावाला उत्तर देईल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर कराराच्या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी दबाव टाकत आहेत. पण इराणी पक्ष कोणत्याही घाईत नाही. ट्रम्प उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत, तर इराणचे स्पष्ट म्हणणे आहे की, कराराची कोणतीही डेडलाइन नाही. आम्ही आमच्या योग्य वेळी उत्तर देऊ.Trump’s



होर्मुझवर पुढे काय होणार

इराणने गुरुवारी होर्मुझ सामुद्रधुनी पार करणाऱ्या व्यापारी जहाजांसाठी ४० प्रश्नांचा सविस्तर फॉर्म जारी केला. इराणने जाहीर केले आहे की, डीलची पहिली प्रमुख अट होर्मुझवर त्यांचाच ताबा राहील ही असेल. त्यांनी जगाला संदेश दिला की होर्मुझ हे ट्रम्प यांचे वॉटरलू ठरेल.

इराणी नेतृत्वाची भूमिका

या मुद्द्यावर इराणचे नेतृत्व पूर्णपणे एकजूट आहे. पीस डीलच्या प्रस्तावावरील इराणी उत्तराच्या चर्चांदरम्यान राष्ट्राध्यक्ष पझेशकियान यांनी गुरुवारीच सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांची विशेष भेट घेतली.

डीलवर काय होऊ शकते

अमेरिका-इराण भविष्यात तीन टप्प्यांतील करार करू शकतात. पहिल्या टप्प्यात दोन्ही बाजूंकडून अधिकृत युद्धबंदीची घोषणा होईल. होर्मुझ सामुद्रधुनी उघडले जाणे आणि नंतर ३० दिवसांच्या आत अणू कार्यक्रम व आर्थिक निर्बंधांवरून इराणला दिलासा देण्याबाबत सविस्तर चर्चा होईल.

ब्रिक्स समिट: इराणी उपपरराष्ट्रमंत्री १४ ला भारत दौऱ्यावर

ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या समिटमध्ये इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझिम गारिबाबादी येऊ शकतात. ही समिट १४ आणि १५ मे रोजी होईल. ब्रेंट क्रूडचे दर गुरुवारी घसरून ९६.६० डॉलर प्रति बॅरलवर आले. तर बुधवारी ब्रेंटचे दर ९८.३० डॉलर प्रति बॅरल होते.

Trump’s ‘Project Freedom’ Stalls as Saudi & Gulf Allies Deny Airbase Access

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात