Weather alert : महाराष्ट्रात अवकाळीचा अलर्ट; 20 ते 22 एप्रिल वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

Weather alert

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Weather alert महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.Weather alert

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली की, राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.Weather alert



हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Weather alert in Maharashtra; Hailstorm with gale forecast from April 20 to 22, CMO warns of caution

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात