Hormuz : होर्मुझ पुन्हा बंद; इराणने भारताचे 14 टँकर रोखले, 2 वर गोळीबार, भारताने इराणी राजदूत फथालींना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला

Hormuz

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Hormuz  अमेरिका-इराणमध्ये कराराच्या पुढाकाराने होर्मुझ उघडण्याचा आनंद २४ तासही टिकू शकला नाही. इराणने होर्मुझ पुन्हा बंद केले आहे. वास्तविक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, जोपर्यंत तेहरान अणुकार्यक्रमासह इतर मुद्द्यांवर करार करत नाही, तोपर्यंत ते जहाजांच्या वाहतुकीवरील नाकेबंदी सुरूच ठेवतील. यानंतर इराणने इशारा दिला की, अमेरिकन नाकेबंदी असेपर्यंत होर्मुझमधून एकही जहाज जाऊ शकणार नाही. या दुतर्फा नाकेबंदीदरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने शनिवारी भारतात येणारे १४ टँकर होर्मुझमध्ये रोखले व दोनवर गोळीबार केला. एका टँकरच्या खिडकीची काच फुटली. दुसऱ्या टँकरचे किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही, पण दोन्ही टँकरना माघारी परतावे लागले.Hormuz

या घडामोडीनंतर इराणने १३ टँकर रोखले. त्यांना पर्शियन आखातात थांबण्यास सांगितले. सूत्रांनुसार, हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी क्रूड घेऊन येणारा व भारताचा झेंडा लागलेला आणखी एक टँकर होर्मुझमधून गेला व भारताकडे येत आहे. या घडामोडीनंतर भारताने नवी दिल्लीत इराणी राजदूत मोहम्मद फथालींना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला. भारत त्यांना सुरक्षित आणण्यासाठी इराणशी समन्वय साधत आहे. यादरम्यान, इराणने म्हटले की ते अमेरिकेच्या नव्या प्रस्तावांवर विचार करत आहेत. त्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही, पण म्हटले आहे की अमेरिकेला आपल्या अतिरिक्त मागण्या सोडाव्या लागतील. जोपर्यंत युद्ध पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत होर्मुझवर नियंत्रण ठेवेल. मात्र ट्रम्प यांनी इशारा दिला की कमकुवत इराण होर्मुझवर ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या स्थितीत नाही.Hormuz



इराणमध्ये एकमत नाही, ट्रम्प युरेनियम जप्तीवर ठाम

अमेरिकेशी कराराच्या तयारीदरम्यान इराणमध्येच याला विरोध होत आहे. शुक्रवार रात्रीपासून सरकारचे समर्थकही निदर्शने करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की सर्वोच्च नेते व कमांडर शहीद झाल्यानंतर अमेरिकेला कोणत्याही कारणाशिवाय सवलती देणे चुकीचे आहे. सभापती गालिबाफ यांच्यावरही विश्वासघाताचे आरोप लावले जात आहेत. सूत्रांनी सांगितले की, आयआरजीसी अमेरिकेला युरेनियम सोपवण्यास तयार नाही, तर ट्रम्प युरेनियम जप्तीवर ठाम आहेत. दुसरीकडे, आयआरजीसीचे मानणे आहे की होर्मुझही उघडले व युरेनियमही सोपवल्यास इराण झुकल्याचा संदेश जाईल. आयआरजीसीने पाक लष्करप्रमुख मुनीर यांच्याद्वारे ट्रम्पना नाकेबंदी उठवल्यानंतर कराराचा संदेश पाठवला.

पाकिस्तानमध्ये डीलवर चर्चा उद्या

अमेरिकन व इराणी पथके सोमवारी पथकांसोबत इस्लामाबादेत चर्चेची दुसरी फेरी करू शकतात. मसुदा तयार होताच ट्रम्प, इराणी राष्ट्राध्यक्ष पझेश्कियान इस्लामाबादला जातील. युद्धविराम बुधवारी संपणार आहे.

अमेरिकेने पुन्हा एकदा यू-टर्न घेत रशियन तेल खरेदीवरील सवलतीची मर्यादा एका महिन्याने वाढवली आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी सवलत संपवण्याची घोषणा केली होती. अमेरिकन ट्रेझरी विभागाने ही सवलत १६ मे पर्यंत वाढवली. याअंतर्गत भारतासह जगातील सर्व देश (इराण, क्युबा, उ. कोरिया वगळून) प्रतिबंधित रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करू शकतील. यापूर्वी, भारताला ५ मार्चपासून एका महिन्यासाठी रशियन तेल खरेदी करण्याची सवलत देण्यात आली होती.

भारताच्या १४ पैकी ६ टँकर्समध्ये कच्चे तेल

दोन इराणी गनबोटी ओमानपासून ३७ किमी ईशान्येला केशम-लारक बेटांच्या दरम्यान पोहोचल्या आणि पूर्वसूचनेविना गोळीबार केला. सनमार हेराल्ड या भारतीय टँकरचा ऑडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो गोळीबार थांबवण्याचे आवाहन करत आहे. भारतात जाणाऱ्या १४ टँकर्सपैकी ७ वर भारताचा झेंडा, ४ वर लायबेरियाचा झेंडा, २ वर मार्शल आयलँड्स आणि एकावर व्हिएतनामचा झेंडा लागलेला आहे.

Hormuz Strait Closed Again: Iran Fires on Indian Tankers; New Delhi Summons Envoy

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात