नाशिक : मोदी सरकारची चलाखी; प्रियांका गांधींची कबुली!!, हेच राजकीय वास्तव प्रियांका गांधींनी महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयकांवर केलेल्या भाषणातून समोर आले.
मोदी सरकार अत्यंत चलाख असल्याची कबुलीची प्रियांका गांधींनी आपल्या भाषणातून दिली. काँग्रेसने सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर तशाच स्वरूपाची कबुली देऊन प्रियांका गांधींचे भाषण व्हायरल केले.
मोदी सरकारच्या कामाची पद्धत वर्णन करताना प्रियांका गांधी जे बोलल्या, त्यातून मोदी सरकारची चलाखीच सगळ्यांसमोर आली. सरकारची कार्यपद्धती पाहून चाणक्य सुद्धा लाजेल, असा टोमणा त्यांनी मारला. त्यावर गृहमंत्री अमित शाह हसत राहिले.
प्रियांका गांधींची कबुली
पण त्याचवेळी प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारने सगळ्या विरोधकांना धर्म संकटात टाकले असल्याची कबुली दिली. एकीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असताना संसदेचे अधिवेशन बोलवायचे. पण सर्वपक्षीय बैठक घ्यायची नाही. संबंधित विधेयकाचे प्रारूप सुद्धा अधिवेशनाच्या आधी फक्त एक दिवस जाहीर करायचे की ज्यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांना आपापसांमध्ये चर्चा करायची सुद्धा संधी मिळू नये. त्याचवेळी मोदी सरकार माध्यमातून अशी वातावरण निर्मिती सुरू करते, की मोदी महिलांच्या प्रगतीसाठी फार मोठे पाऊल उचलत आहे. सबब सगळ्या विरोधकांनी त्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन साथ दिली पाहिजे. त्यामुळेच विरोधकांच्या पुढे धर्म संकट उभे राहिले. एकीकडे महिला आरक्षण आणि दुसरीकडे संपूर्ण ढांचाच बदलायची तयारी, ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करायची मूभा मिळवायची.
विरोध झोपले होते का??
हे महत्त्वाचे मुद्दे प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात मांडले. तेच काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले. पण मोदी सरकारने सगळ्या विरोधकांना धर्म संकटात टाकेपर्यंत सगळे विरोधक झोपले होते का?? मोदी सरकार भले विरोधकांना धर्म संकटात टाकेल, पण विरोधकांनी त्यात पडायचेच नाही, असे ठरविले तर सरकार विरोधकांचे काय वाकडे करेल?? आणि अगदी मोदी सरकारने टाकलेल्या धर्म संकटात विरोधक पडले, तरी त्यातून सुटायची हातोटी विरोधकांकडे का नाही??, हे सवाल कुणी प्रियांका गांधींना विचारले म्हणून त्यांनी त्यांची त्यांना उत्तरे द्यावी लागली नाहीत.
आजी कडून कोण शिकणार??
मोदी आणि त्यांचे सरकार जर अति चलाख आहेत, तर विरोधक काय बावळट आहेत का??, त्यांना मोदी सरकारच्या चलाखी वर मात करायला काय अडचण आहे??, विरोधकांकडे काय कमी बुद्धिमान खासदार आहेत का??, विरोधी नेत्यांनी आपल्या बुद्धिमान खासदारांना कामाला लावून मोदी सरकारने टाकलेले धर्म संकट उखडून टाकावे. मोदी सरकार खूप चलाख आहे, अशी नुसती कबुली देऊन प्रियांका गांधींनी हात झटकण्यात काय अर्थ आहे??, राहुल गांधी आपल्या आजीकडून राजकीय चलाखी शिकले नाहीत. पण ती चलाखी प्रियांका गांधींनी शिकायला काय हरकत आहे??
इंदिरा गांधींची चलाखी
प्रियांका गांधींनी मोदींची आणि त्यांच्या सरकारची जी चलाखी की कबूल दिली, त्यांच्यापेक्षा इंदिरा गांधी कितीतरी चलाख होत्या. त्यांनी त्यांच्या काळातल्या सगळ्या बुद्धिमान विरोधकांना कायम बुचकाळ्यात आणि धर्मसंकटात टाकले होते. इंदिरा गांधी कधी विरोधकांच्या चलाखीची कबुली देत फिरल्या नव्हत्या. त्यांनी विरोधकांच्या बुद्धिमत्तेवर आणि चलाखीवर कायम मात केली होती. इंदिरा गांधी विरोधकांच्या पुढे झुकल्या नाहीत. त्यांनी विरोधकांना वाकविले होते. हा इतिहास जरी प्रियांका गांधी यांनी नुसता वाचला, तरी त्यातून काही प्रेरणा घेऊन त्या राजकीय वर्तणूक करू शकतील. मग नुसतीच मोदींची आणि त्यांच्या सरकारची चलाखी कबूल करायची वेळ त्यांच्यावर येणार नाही आणि काँग्रेसला सुद्धा प्रियांका गांधी यांचे कबुलीचे भाषण व्हायरल करण्याची गरज पडणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App