Anna Hazare : जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा- अण्णा हजारे; युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

Anna Hazare

विशेष प्रतिनिधी

पारनेर : Anna Hazare जगभरात वाढत चाललेला संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक स्तरावर शांतता आणि संवादासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे.Anna Hazare

विविध देशांमधील वाढत्या संघर्षांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित होत चालले असून या संघर्षांचा सर्वाधिक फटका निरपराध महिला, मुले आणि कुटुंबीयांना बसत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. युद्धाच्या छायेत जगणाऱ्या या नागरिकांच्या वेदनादायक परिस्थितीबाबतही हजारे यांनी पत्रात चिंता व्यक्त केली आहे.Anna Hazare



भारताची परंपरा अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. भारताने नेहमीच जगाला संवाद आणि सहजीवनाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे हजारे यांनी नमूद केले. अशा संवेदनशील काळात भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राने मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात अधोरेखित केले. आज जगाला शस्त्रास्त्रांची नव्हे, तर विश्वास आणि संवादाची गरज आहे.

भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घ्यावी

भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता आणि संवादाला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. संवेदनशील काळात भारताने मानवता, शांततेची बाजू घ्यावी.

Anna Hazare Urges PM Modi to Lead Global Peace Amid War Crisis VIDEOS

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात