सत्ता कुठल्याही पवारांनीच भोगायची, पण इतरांवर फोडायचे खापर; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी ही तर मोठी तडफड!!

नाशिक : कुठल्याही पवारांनीच सत्ता भोगायची, पण इतरांवर फोडायचे खापर; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी ही तर मोठी तडफड!!, हेच राजकीय वास्तव आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वक्तव्यांमधून समोर आले.

– शपथविधी सुनेत्रा पवारांचा, खापर इतरांवर

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर रोहित पवारांनी ज्या प्रकारे मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताविषयी प्रेझेंटेशन केले. त्यातून सगळी संशय पेरणी केली. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांच्यावर आरोप केले, ते पाहता पवार सोडून इतरांना टार्गेट करायचाच त्यांचा हेतू उघड्यावर आला. कारण सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांना रोहित पवारांनी दोष दिला नाही, तर त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावणाऱ्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांना टार्गेट केले. जणूकाही सुनेत्रा पवार यांची सत्ता प्रफुल्ल पटेल आणि इतर नेतेच भोगणार आहेत, असा आव रोहित पवारांनी आणला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्ता भोगणाऱ्या सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या दोन्ही मुलांवर रोहित पवारांनी आक्षेप घेतला नाही किंवा त्यांची चूक झाली, असेही म्हटले नाही, तर त्यांनी इतरांवर खापर फोडले.

– सुप्रिया सुळे यांची हतबलता

रोहित पवारांचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत उचलून धरले. रोहितला जर अजितदादांच्या विमान अपघाताविषयी शंका असेल, तर ते स्वाभाविक आहे. त्याने ती प्रेझेंटेशन द्वारे मांडली. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सखोल चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशीचा निष्कर्षाची वाट पाहू, असे सुप्रिया सुळे जरूर म्हणाल्या, पण विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी गोलमालच उत्तरे दिली. राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे म्हणजे तुम्ही भाजप बरोबर जाणार का??, या सवालाचे थेट उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले नाही. विलीनीकरणाच्या चर्चा दादा आणि माझ्यातच झाल्या. त्या चर्चांची इतर लोकांनाही माहिती आहे, पण मी काही बोलले, तर काही लोकांना आवडत नाही. आता दादा नसल्यामुळे उगाच कुणाची उणी दुणी काढण्यातही मतलब नाही. दादा जाण्याच्या आम्ही दुःखात आहोत. त्यातून अजून सावरतो आहोत. त्यामुळे उगाच आता विलीनीकरणाची चर्चा मी तरी करत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.



– सुनेत्रा पवारांच्या वर्चस्वाची भीती

रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यांमधून पवारांची हतबलताच समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करणे हे आपल्या हातात उरले नाही, ते अन्य कुणाच्यातरी हातात निघून गेले. मग भले उपमुख्यमंत्री पदावर राहून सुनेत्रा पवार जरी निर्णय घेणार असल्या तरी विलीनीकरणाच्या निर्णयात त्यांचे वर्चस्व राहील, ही अस्वस्थता पवारांच्या राष्ट्रवादीत पसरलीय. त्याचेच प्रतिबिंब रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यांमधून वेगळ्या वेगळ्या मार्गांनी उमटले. रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमाना अपघाता विषयी संशय पेरणी करून आक्रमकपणा दाखविला, पण आता विलीनीकरण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला विलीनीकरणातून मिळणारा लाभ म्हणजेच महाराष्ट्रात एखाद्या राज्यमंत्रीपद मिळणार नाही, हीच हतबलता रोहित पवारांच्या बोलण्यातून बाहेर आली, फक्त तिचे स्वरूप आक्रमक राहिले. पण मूळ हतबलता लपून राहिली नाही.

– स्वतः सत्ता भोगा, इतरांवर खापर फोडा

सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातूनही तीच हतबलता दिसून आली फक्त सुप्रिया सुळे यांचे आजचे वक्तव्य रोहित पवार यांच्या एवढे आक्रमक नव्हते आता दादाच नाहीत तर उगाच कुणाची उणी दुणी कशाला काढायची??, या सुप्रिया सुळे यांच्या वाक्यातून त्यांची हतबलता उघड झाली. आता विलीनीकरणाची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आपल्या हातात ते काही उरले नाही, ही ती हतबलता होती. म्हणूनच त्यांनी तुम्ही भाजपबरोबर जाणार का??, या प्रश्नाचे उत्तर थेटपणे दिले नाही.

रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या आजच्या वक्तव्यातून हेच राजकीय सत्य समोर आले, ते म्हणजे कुठल्याही का होईना पण पवारांनीच सत्ता भोगायची, पण खापर मात्र इतरांवर फोडायचे आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी तडफड करत राहायचे!!

Sharad Pawar faction very much eager for NCP unification

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात