नाशिक : रोहित पवार हे नवे राहुल गांधी बनलेत की ते संजय राऊत इन मेकिंग बनत चाललेत??, असा सवाल विचारायची वेळ त्यांच्याच गेल्या तीन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून पुढे आली. Rohit Pawar
– राहुल गांधींसारखेच प्रेझेंटेशन
कारण रोहित पवारांनी ज्या प्रकारे मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदांमध्ये प्रेझेंटेशन केले, त्यावरून ते राहुल गांधींच्या भूमिकेत शिरल्याचे सुरुवातीला दिसले. कारण रोहित पवारांनी ज्या पद्धतीने अजित पवारांच्या विमान अपघाताविषयीचे प्रेझेंटेशन पत्रकार परिषदेत सादर केले, त्याच पद्धतीने आधी राहुल गांधींनी vote chori च्या विषयावर दिल्ली आणि बंगलोर अशा ठिकाणी जाऊन पत्रकार परिषदांमध्ये प्रेझेंटेशन सादर केले होते. पण राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनचा कुठलाच फरक किंवा परिणाम केंद्रातल्या मोदी सरकार वर झाला नाही, की कुठल्या राज्य सरकारवर झाला नाही. अगदी काँग्रेसच्या राज्य सरकारांवर सुद्धा vote chori च्या प्रेझेंटेशनचा परिणाम झाला नाही. याला अपवाद फक्त कर्नाटक राज्य ठरले. कारण कर्नाटकात तिथल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM वर घेण्याऐवजी बॅलेट पेपरवर घेतल्या, पण बाकी कुठल्याच राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या नाहीत. त्यामुळे राहुल गांधींचे प्रेसेंटेशन राजकीय दृष्ट्या फोल ठरले.
रोहित पवारांचे अजित पवारांच्या विमान अपघाताविषयीचे प्रेझेंटेशन त्या पद्धतीने फोल ठरले, असे निदान सध्यातरी म्हणता येणार नाही, पण त्याचवेळी ज्यावेळी VSR ventures private limited कंपनीच्या विमानातून अजित पवारांनी मुंबई ते बारामती प्रवास केला, त्या कंपनीला सुरुवातीच्या स्पेशल ऑडिटच्या टप्प्यातून केंद्राच्या टीमने वगळले ही बाब काल आणि आजच समोर आली. त्यामुळे राहुल गांधींच्याच प्रेसेंटेशन प्रमाणे रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनची वासलात लागते की काय??, असा संशय राजकीय वर्तुळात बळावला. पण म्हणून केंद्र सरकारने अथवा राज्य सरकारने विमान अपघाताची चौकशी थांबविलेली नाही.
– रोहित पवारांचे आरोप, पण पुराव्यांशिवाय
पण रोहित पवार फक्त पवारांच्या विमान अपघाताविषयी प्रेझेंटेशन करून थांबले नाहीत. त्यांनी त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केले आणि सुनेत्रा पवार यांना नाईलाजाने शपथ घ्यायला अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी भाग पाडले, असा आरोप केला. यावेळी त्यांचा अंगुली निर्देश प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर होता. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी विलीनीकरण करण्यासाठी जो धडपडाट केला, त्या धडपडाटाचा एक भाग म्हणून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या आणि मराठा नसलेल्या नेत्यांना टार्गेट केले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान साधले. आज तर रोहित पवारांनी त्यापुढे जाऊन अजित पवारांनाच त्यांच्या पक्षातले नेते एकटे पडत होते, असा आरोप केला. डिझाईन बॉक्स कंपनीचा नरेश अरोरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कॉन्ट्रॅक्ट द्यायला अजित पवारांचा विरोध होता पण त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा नरेश अरोरांनाच पाठिंबा होता, असा दावा रोहित पवारांनी केला. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आपण सोमवारी आणि मंगळवारी बोलू. त्यानंतर सुनील तटकरे यांनी तारीख जाहीर करून आपल्याला उत्तरे द्यावीत, असे रोहित पवार म्हणाले. पण रोहित पवारांनी यापैकी एकाही आरोपाला किंवा दाव्याला पुष्टी देईल, कुठलाही पुरावा सादर केला नाही.
– ही स्टाईल तर संजय राऊतांची
संजय राऊत ज्याप्रमाणे रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन आरोपांच्या फैरी झाडतात, पण एकाही आरोपाला पुरावा सादर करत नाहीत, त्याप्रमाणे रोहित पवारांनी गेल्या तीन दिवसांपासून पत्रकार परिषदांचा धडाका लावला. सुरुवातीच्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी आरोप केले नाहीत, पण नंतर मात्र ते आरोप न करण्याच्या मर्यादेत राहिले नाहीत. त्यांनी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल वगैरे नेत्यांची नावे घेऊन आरोप करायला सुरुवात केली. त्यामुळेच ते राष्ट्रवादीतले “संजय राऊत इन मेकिंग आहेत का??”, असा संशय बळावत चालला. सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर अजून तरी उत्तरे दिलेली नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App