विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावे लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. Chhagan Bhujbal
दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे विविध जिल्ह्यात दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली. तत्पूर्वी भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांवर भाष्य केले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Chhagan Bhujbal
आम्हाला भाजपला विचारावे लागेल
छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जे काही करायचे ते आम्हाला भाजपसोबत राहून करायचे आहे. असे काही करायचे असेल तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे, कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनाही विचारावे लागेल. काय बोलणे झाले हे माझ्यासह कोणालाही माहित नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणासंबंधी मुख्यमंत्र्यांना तर विचारावेच लागेल. ज्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना. जर सरकारमधून बाहेर पडायचे असेल, एनडीएबरोबर जायचे असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. मात्र, असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही. आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली, आता त्यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील, कधी-कधी नाही होत, असे म्हणत सुनेत्रा पवार यांच्यासोबत या संदर्भात चर्चा होईल, असे भुजबळांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App