उमरेखड येथील श्री चिन्मयमूर्ती संस्थान मठाधिपती माधवानंद महाराज यांचा करण्यात आला सन्मान Sri Chinmoymurthy Sansthan
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर – यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन, २२ जून रोजी एकदशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १७ लाख ६८ हजार किंमतीचा सुवर्ण तुळशीहार अर्पण केला.
माधवानंद महाराज यांनी आपल्या भक्तासह पंढरपूर येथे जाऊन विठूरायाला सुवर्ण तुळशीहार अर्पण केला. त्यानंतर पंढरपूरच्या मंदिर समितीच्यावतीने व्यवस्थापक मनोज श्रोती यांनी श्रींची प्रतिमा आणि उपरणे देऊन, येथोचित सन्मान केला. हा सुवर्ण तुळशीहार २३२.९९० ग्रॅम वजनाचा होता आणि त्याची अंदाजे किंमत १७ लाख ६८ हजार रुपये होती.
हा सुवर्ण हार विठूरायाला अर्पण करताना उमरेखड येथील चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती श्री माधवानंद महाराज यांच्यासोबत संस्थानचे कुलमुख्त्यार अॅड. महेश कनकदंडे, कुलमुख्त्यार संदीपराव माहोरकर, सुर्यकांत रत्नपारखे, माधवानंद महाराजांसोबत असणारे सर्व मुख्य ब्रह्मवृंद आणि मराठवाडा, विदर्भातील शिष्य परिवार उपस्थित होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App