Prime Minister Modi : देशात भाजपाचे प्राथमिक सदस्य १४ कोटींवर; पंतप्रधान मोदी पहिले सक्रिय सदस्य, महाराष्ट्रात दीड कोटी सदस्यसंख्या पार

Prime Minister Modi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :Prime Minister Modi भारतीय जनता पक्षाचे (भाजप) देशभरातील प्राथमिक सदस्यत्व १४ कोटींच्या वर गेले असून, हे एक ऐतिहासिक यश असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत ही घोषणा केली.Prime Minister Modi

“भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व १४ कोटींच्या पुढे गेले आहे. हे यश प्रत्येक बूथस्तरीय कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे. भलेही आम्ही मेगा कॅम्पेन थांबवले असले, तरी बूथ पातळीवरील सक्रियतेनेच हा टप्पा गाठता आला आहे,” असे बी. एल. संतोष यांनी म्हटले.

या सदस्यता यशामागे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा मोठा वाटा असून, ‘संघटन पर्व सदस्यता मोहीम २०२४’ अंतर्गत ही घोडदौड सुरु झाली होती. या अभियानाची सुरुवात १६ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पार्टीचे पहिले सक्रिय सदस्य म्हणून नोंदणी करून मोहिमेला सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय संयोजक विनोद तावडे देखील उपस्थित होते.



या मोहिमेअंतर्गत, एका कार्यकर्त्याला किमान ५० नवीन सदस्य नोंदवावे लागतात, तेव्हाच तो ‘सक्रिय सदस्य’ म्हणून पात्र ठरतो. असे सक्रिय सदस्य मांडळ समिती, जिल्हा कार्यकारिणी इत्यादी पदांसाठी निवडणुका लढवू शकतात आणि भविष्यात पक्षाच्या प्रमुख भूमिकांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते.

महाराष्ट्रातील योगदानही विशेष उल्लेखनीय ठरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दीड कोटी सदस्यसंख्येचा टप्पा गाठत देशातील सदस्यता मोहिमेत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.”

बावनकुळे म्हणाले, “हे यश देशभरातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. भारतीय जनता पक्ष ही केवळ एक राजकीय संघटना नसून अंत्योदयाच्या विचारसरणीवर आधारित राष्ट्रनिर्माणाची चळवळ आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे आमचे वचन आहे, आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “भाजपचे सदस्यत्व हे केवळ संघटनात्मक वाढ नसून विकसित भारताच्या संकल्पात सामान्य नागरिकांचा सहभाग दर्शवते.”

या ऐतिहासिक सदस्यता विक्रमामुळे भाजपने पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष हे आपले स्थान कायम ठेवले आहे.

BJP’s primary members in the country are at 14 crore; Prime Minister Modi is the first active member, the number of members in Maharashtra has crossed 1.5 crore.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात