नाशिक : भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी मोदी सरकारने वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला. यामध्ये सरकारने सर्वपक्षीय खासदारांचा समावेश करून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत “संपूर्ण भारत एक” आहे असा संदेश जगाला दिला. सुरुवातीला मोदी सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले. सरकार सांगेल, ते खासदार काँग्रेस पक्ष ही या मोहिमेसाठी देईल असे पक्षाने जाहीर केले, पण पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी मात्र त्यामध्ये वेगवेगळी खुसपटे काढली. Shashi Tharoor
जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी मान्य केली नाही, हे दोन मुद्दे उकरून काढले, पण त्या पलीकडे जाऊन केरळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने एक नवीनच “जावईशोध” यानिमित्ताने लावला, तो म्हणजे मोदी सरकारने खासदारांच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा समावेश केला, कारण त्यांच्या बुद्धिमत्तेच्या तोडीचा नेता आज भाजप मध्ये नाही. त्यामुळे भाजप मधला talent vacuum भरून काढण्यासाठी सरकारने खासदारांच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांची निवड केली, असा दावा केरळ काँग्रेसने आपल्या अधिकृत x हँडल वरून केला. जणू काही भाजपने एकट्या शशी थरूर यांनाच खासदारांच्या शिष्टमंडळात निवडून त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतल्याचा आभास केरळ काँग्रेसने निर्माण केला.
वास्तविक मोदी सरकारने घेतलेला हा सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचा मंडळाचा निर्णय अजिबात नवीन नाही. 1990 च्या दशकात पाकिस्तान बरोबर संघर्षाची स्थिती आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी संयुक्त राष्ट्रसंघात तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे असे शिष्टमंडळ पाठवलेच होते. वाजपेयींकडे नेतृत्व देऊन त्या शिष्टमंडळात त्यावेळचे परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांचा समावेश केला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्रसंघात diplomatic strike यशस्वी करून पाकिस्तानला हरवले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आणि सलमान खुर्शीद हे एकमेकांना आलिंगन देत असल्याचे फोटो भारतभरातल्या माध्यमांनी प्रसिद्ध केले होते.
मग केरळ काँग्रेसचे आजचे argument खरे मानले, तर त्यावेळी काय काँग्रेसमध्ये talent vacuum म्हणजेच हुशारीची कमतरता होती म्हणून नरसिंह राव यांनी भाजपच्या अटल बिहारी वाजपेयी यांना भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व दिले होते का??, असा सवाल तयार झाला आणि त्याचे उत्तर अर्थातच “नाही” याच शब्दांनी दिले जाऊ शकते.
कारण भारत आता एवढा लोकशाही दृष्ट्या प्रगल्भ देश झाला आहे की, अंतर्गत मतभेद निराळे आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे निराळे याची जाणीव भारतातला political class ला नक्की ठेवतो म्हणूनच नरसिंह राव यांच्यासारख्या प्रगल्भ पंतप्रधानाने अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या प्रगल्भ विरोधी पक्षनेत्याकडे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सोपविले होते.
– Talent वापरायला काँग्रेसला कोणी अडवले??
पण काँग्रेसमध्ये आज नेमका या प्रगल्भतेचा अभाव असल्यामुळे केरळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी भाजप मधल्या talent vacuum चा शोध लावून तो शशी थरूर भरून काढत असल्याचा पुढचा “जावईशोध” लावला. पण त्या पलीकडे जाऊन हा “जावईशोध” अगदी खरा जरी मानला, तरी त्यातून काँग्रेस पुढे एक सवाल तयार होतोच तो म्हणजे शशी थरूर जर एवढे talented आहेत, तर काँग्रेस त्या talent पासून एवढी “रिकामी” का राहते??, दूर का पळते??, शशी थरूर यांच्या talent चा पंतप्रधान नरेंद्र मोदी जर चांगला उपयोग करून घेऊ शकतात, तर काँग्रेसचे नेते त्याचा अधिक चांगला उपयोग का करून घेऊ शकत नाहीत??, शशी थरूर यांच्याकडे ते सध्याच्या पेक्षा चांगली आणि मोठी जबाबदारी का सोपवत नाहीत??, शशी थरूर यांच्या talent चा वापर करून घ्यायला काँग्रेसला कोणी अडवलेय??, हे कळीचे सवाल आहेत.
… की शशी थरूर यांच्या political talent ची काँग्रेसलाच एवढी भीती वाटते की, थरूर यांच्या talent पुढे गांधी घराण्यातल्या “दिव्यांचे” talent कमी पडेल, याची खात्री असल्याने काँग्रेस हायकमांड शशी थरुर यांना खासदारकी पेक्षा जास्त मोठे पद आणि जबाबदारी देऊन पुढे आणत नाही??, हा सवाल बोचरा, पण खरा आहे. पण काँग्रेसवाले आज तरी त्याचे उत्तरे देणार नाहीत. कारण त्याचे उत्तरे त्यांना माहिती असली तरी ते देणे politically correct ठरणार नाही, याची त्यांना जाणीव आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App