युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सैन्यदलास देण्यात आले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Masood Azhar ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या आणखी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद जमील हमजा आहे, जो मोहम्मद अझहरचा पुतण्या होता. बहावलपूर दहशतवादी छावणीवर सैन्याने हल्ला केला तेव्हा हमजा मारला गेला.Masood Azhar
याआधी काल ऑपरेशन सिंदूरची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर मार्शल ए.के. यांनी दिली. भारती आणि व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
यावेळी सांगण्यात आले की, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त झाले. पाकिस्तानी घुसखोरीला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याचे मोठे नुकसान पोहचवले. युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सीर अहमद हे भारताच्या निशाण्यावर होते. गुप्तचर यंत्रणेच्या आधारे, 9 दहशतवादी तळांची पुष्टी झाली. मुख्य लक्ष्य: भावलपूर आणि मुरीदके होते.
युद्धबंदीनंतरही, यूएव्ही आणि लहान ड्रोनचा हल्ला भारतीय नागरी आणि लष्करी क्षेत्रात झाला, मात्र हे ड्रोन यशस्वीरित्या रोखण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी याला चोख प्रत्युत्तर दिले. शिवाय, सर्व फील्ड कमांडर्सना कोणत्याही युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App