Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतावर अणुबॉम्ब टाकायचा आहे की भारताबरोबर युद्धच नकोय??, या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांमध्येच गोंधळ झाला आहे आणि त्यात भारताच्या हल्ल्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर पडली आहे.

भारताने काल पाकिस्तानच्या 7 लष्करी आणि हवाई तळांवर हल्ले करून ते निकामी केले. भारताने अत्याधुनिक शास्त्रांच्या सहाय्याने सियालकोट, चकलाला, रफीकी, मुरीद रफिक खान यार हे लष्करी आणि हवाई तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण दलांचे मोठे नुकसान झाले.

पण आज सकाळीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को व्हिडिओ यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याला फोन करून युद्ध थांबविण्यासाठी दम भरला. पण या दरम्यानच्या काळात पाकिस्तानी कमांड अथॉरिटीची बैठक झाल्याचे बोलले गेले. कुठल्याही युद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर करायचा का नाही, हे ठरविण्याचा अधिकार पाकिस्तानच्या कमांड ऑथॉरिटीला आहे. या ॲथॉरिटीची बैठक झाल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाली. त्यामुळे आता अमेरिका गरम होणार हे लक्षात येताच, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कमांड‌ अथॉरिटीची कुठली बैठक झाल्याचाच इन्कार केला. त्यामुळे भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा ऑप्शन पाकिस्तान पुढे उरला नाही.

त्यानंतर लगेच पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पाकिस्तानला युद्ध नको, असे वक्तव्य केले. भारताने हल्ले थांबवावेत. आम्हीही हल्ले थांबवू, असे इशाक दार म्हणाले. त्याचदरम्यान पाकिस्तानातल्या अबू जुंदाल सह 5 कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची लिस्ट समोर आली. यात मसूद अजहरचे पाच नातेवाईक भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये मारल्याचे कन्फर्म झाले.

Pakistan in confusion about fighting with India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात