महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासन, पोलीस, SDRF आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव आणि मदत कार्यावर लक्ष केंद्रित करण्याचेही सांगितले आहे.Heavy rains and floods in many parts of Maharashtra



रविवारी मुंबई, कोकणातील काही जिल्हे आणि इतर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत. त्यांनी नागरिकांनी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आयएमडीच्या संपर्कात राहण्यास सांगितले

एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना आयएमडी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वेळेवर माहिती मिळवून नागरिकांना मदत करण्यासाठी कृती योजना तयार करण्यास सांगितले. आयएमडी इशाऱ्यांशी संबंधित माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. याशिवाय त्यांनी प्रशासनाला आपत्ती आणि अपघात प्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यास सांगितले. एनडीआरएफ, एसडीआरएफ या आपत्ती व्यवस्थापन दलांची तयारी पूर्ण झाली पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला.

Heavy rains and floods in many parts of Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात