आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतरही सारवासरव करण्यासाठी जयंत पाटील + छगन भुजबळ जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणार ही अफवा खरी मानून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळा आंदोलन केले. या आंदोलनात मनुस्मृति फाडण्याच्या नावाखाली जितेंद्र आव्हाडांनी विश्वरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारू शकतो हे लक्षात येत जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर माफी मागितली. Jayant Patil Chhagan Bhujbal with support of Jitendra Awhad

आता त्यांच्या मूळ कृतीवर आणि नंतरच्या माफी वर सारवासारव करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे आव्हाडांच्या पाठीशी उभे राहिले. हे दोन्ही नेते आपल्या पाठीशी उभे राहिले हे पाहिल्यावर नवे “चंद्रबळ” लाभलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी दोघांचे आभार मानून टाकले.

मूळात मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होणार ही अफवा सोशल मीडियात पसरली आणि ती अफवा खरी मानून आव्हाडांनी मनुस्मृति जाळा आंदोलन केले. त्यामध्ये मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड संतापाचे वातावरण उसळले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या विरोधात मोठे आंदोलने केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठवली. आव्हाडांच्या अटकेचे मागणी त्यांनी केली. आव्हाड यांचे कृत्य कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते हे खुद्द त्यांच्या आणि इतर नेत्यांच्याही लक्षात आले त्यामुळे या सगळ्याच नेत्यांनी सारवारव करून जितेंद्र आव्हाडांच्या गुन्ह्याला झाकण्याचा करण्याचा प्रयत्न केला.

स्वतः आव्हाड यांनी माफी मागणारे ट्विट केले. त्यानंतर आज जयंत पाटलांनी आव्हाडांचे समर्थन करणारी पोस्ट लिहिली. त्याचबरोबर राज्याचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सीनियर मोस्ट नेते छगन भुजबळ यांनी आव्हाडांची बाजू घेतली. जितेंद्र आव्हाड चुकले. त्यांनी माफी मागितली. त्यामुळे त्यांच्यावर आता त्या मुद्द्यावरून टीका करणे योग्य नाही, अशी मखलाशी भुजबळ यांनी केली.

एरवी जितेंद्र आव्हाड अजित पवार यांना वेगवेगळ्या गोष्टींवर धारेवर धरतात. पण त्यांच्याच पक्षातले सीनियर मोस्ट नेते आपल्या बाजूने उभे राहिले म्हटल्यानंतर त्यांनी छगन भुजबळ साहेबांच्या नावाने पोस्ट घेऊन त्यांचे आभार मानले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या चुकीनंतर जयंत पाटील आणि छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांना नवे “चंद्रबळ” लाभले!!

Jayant Patil Chhagan Bhujbal with support of Jitendra Awhad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात