मी नार्को टेस्ट क्लियर केली तर अंजली दमानिया घरी बसतील का??; अजितदादांचे प्रतिआव्हान!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्याचं हिट अँड रन प्रकरण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फोन केला होता. त्यांनी फोन केला होता की नाही याचा खुलासा करावा. त्यांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. दमानिया यांचं नार्को टेस्टचं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले असून माझी नार्को टेस्ट क्लिअर आली, तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही. त्यांनी घरात बसायचं. संन्यास घ्यायचा. त्यांची आहे का तयारी??, असे प्रतिआव्हानच अजित पवार यांनी दिले. If I clear the narco test, will Anjali Damania sit at home?

पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोणताही हस्तक्षेप न करता प्रकरण हाताळण्याचं पोलिसांना सांगितलं आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि योग्य तपास करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणात ज्या मुलाने अपघात घडवला. तो आतमध्ये आहे. त्याचा बाप आतमध्ये आहे. त्याच्या बापाचा बापही आतमध्ये आहे. कायद्याने आणि नियमाने जी चौकशी व्हायला हवी होती ती सुरू आहे. या प्रकरणात कोणी दोषी असतील… मग त्यात अजित पवार जरी दोषी असला तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.



दारूच्या बाटल्या…

पुणे आयुक्तालय परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दारूच्या बाटल्या सापडल्याच्या प्रकरणाचीही चौकशाी होणार आहे. उद्या कुठे दारूच्या बाटल्यांचा खच सापडला तर त्या तुम्हीच टाकल्या असा त्याचा अर्थ होतो का??, असा उलटा सवालही अजितदादांनी विचारला.

अपघात प्रकरणातील लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे दारूच्या बाटल्यांचा खच ज्या ठिकाणी सापडला किंवा पाहायला मिळाला त्यात जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. कशा बाटल्या आल्या? कोणी आणल्या?? त्याचा टॅक्स भरला गेलाय का?? एक्ससाइजचं त्याच्याबद्दल काय मत आहे? या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. त्या डुप्लीकेट आहेत का ओरिजनल आहेत?? या सगळ्या गोष्टी तपासायच्या असतात, असेही ते म्हणाले.

महापुरुषांचा आदर करा

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृति जाळण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात मला काहीही माहिती नाही. या संदर्भात माहिती घेतो. देशामधील जे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांबद्दल प्रत्येकाला आदर असतो. त्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. त्यातून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत त्याबद्दलची काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे, असा सल्लाही अजितदादांनी दिला.

If I clear the narco test, will Anjali Damania sit at home?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात