अखेर नवाझ शरीफ यांनी चूक मान्य केलीच
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : ‘पाकिस्तानने भारतासोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केले आणि आमच्याकडून चूक झाली.’ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन)चे नवनिर्वाचित अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी आपली चूक मान्य केली आहे. Nawaz Sharif admitted the mistake we violated the agreement with former Prime Minister Atalji
नवाझ शरीफ म्हणाले की, 28 मे 1998 रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या होत्या. यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानात आले आणि एक करार झाला. नवाझ शरीफ पुढे म्हणाले की, ‘आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले आणि ही आमची चूक होती.’
21 फेब्रुवारी 1999 रोजी शरीफ आणि वाजपेयी यांनी शिखर परिषदेनंतर लाहोर करारावर स्वाक्षरी केली होती. या करारात दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे कारगिल युद्ध झाले.
नवाझ शरीफ यांनी इम्रान खानवर निशाणा साधला
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आण्विक कार्यक्रम थांबवण्यासाठी पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, असा दावाही पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले, ‘मी ही ऑफर नाकारली होती पण माजी पंतप्रधान इम्रान खान माझ्या खुर्चीवर असते तर त्यांनी क्लिंटन यांची ऑफर नक्कीच स्वीकारली असती.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App