तेलंगणात अधिकाऱ्याकडे आढळली 100 कोटींची मालमत्ता; 40 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त

वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणाचे सरकारी अधिकारी शिव बालकृष्ण यांच्या घरावर गुरुवारी (25 जानेवारी) सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकला. बुधवारी (24 जानेवारी) एसीबीने त्यांच्या घर आणि कार्यालयासह 20 ठिकाणी छापे टाकले.100 crore property found with officer in Telangana; 40 lakh cash and note counting machine seized

यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोने, 60 महागडी घड्याळे, 14 स्मार्ट फोन, 10 लॅपटॉप आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची एकूण किंमत 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. बालकृष्ण यांच्या घरातून नोटा मोजण्याचे यंत्रही जप्त करण्यात आले आहे. आज उघडल्या जाणार्‍या 4 बँकांमध्येही त्यांच्या नावावर लॉकर्स सापडले आहेत.



बालकृष्ण हे तेलंगणा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (TSRERA) चे सचिव आहेत. ते हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणाचे माजी संचालकही राहिले आहेत. बालकृष्ण यांनी अनेक रिअल इस्टेट कंपन्यांना परमिटची सुविधा देऊन कोट्यवधी रुपये कमावल्याचा एसीबीचा आरोप आहे.

24 जानेवारीला पहाटे 5 वाजता हैदराबाद येथील बालकृष्ण यांच्या घराची झडती सुरू झाली. पथकांनी एकाच वेळी 20 ठिकाणी छापे टाकले. वृत्तानुसार, अधिकाऱ्यांना झडतीनंतर आणखी पैसे आणि मालमत्ता सापडण्याची अपेक्षा आहे. पदाचा गैरवापर करून मालमत्ता बळकावल्याप्रकरणी बालकृष्ण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

100 crore property found with officer in Telangana; 40 lakh cash and note counting machine seized

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात