हरियाणात विषारी दारूमुळे १९ जणांचा मृत्यू, सात जणांना अटक

अटक केलेल्या आरोपींमध्ये काँग्रेस नेत्याचा मुलगा आणि जननायक जनता पार्टीच्या नेत्याचाही समावेश 19 people died due to toxic alcohol in Haryana seven people were arrested

विशेष प्रतिनिधी

हरियाणा : हरियाणामध्ये संशयास्पद विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये काँग्रेस नेत्याचा मुलगा आणि जननायक जनता पार्टी नेत्याचाही समावेश आहे.

यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का माजरा, फुसगढ आणि सारण या गावांमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूंबाबतही राजकारण सुरू झाले आहे. या मृत्यूवरून विरोधी पक्षांनी मनोहर लाल खट्टर सरकारवर टीका केली आहे. याआधीच्या अशाच घटनांवरून हरियाणा सरकार धडा घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांमध्ये एका ७० वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. त्यांचा मुलगा रविंदर म्हणाला, “माझ्या वडिलांचा काल रात्री विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला. त्यांना दारूचे व्यसन होते, मात्र ते सहसा फार कमी दारू प्यायचे. ते मित्रांसोबत दारू प्यायचे. याआधीही विषारी दारू प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

19 people died due to toxic alcohol in Haryana seven people were arrested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात