विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेते उदय टिकेकर यांची लेक म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची कबुली देत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. स्वानंदीने इंडियन आयडल फेम आशिष कुलकर्णी ला आपल्या आयुष्याचा साथीदार म्हणून निवडले. त्यानंतर दोघांनी आपल्या जवळच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत थाटामाटात साखरपुडा केला. Actress Swanandi Tikekar news
आता त्यांची लग्न घटिका समीप आली असून त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली आहे. नुकताच स्वानंदी आणि आशिष च्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यासंबंधीचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर द काउंट डाऊन बिगेन्स अशा हटके कॅप्शन ने तिच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने पुढे लिहिले की, केळवणाची सुरुवात तुमच्यापासून झाली आता लाईन लागली आहेच. तुम्ही माझे प्रिय व्यक्ती आहात त्यामुळे तुमची मी आभारी आहे.
View this post on Instagram A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)
स्वानंदी ने शेअर केलेल्या फोटोत तिची शेवटची मालिका अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ची टीम पाहायला मिळते. त्यात अभिनेत्री सुकन्या मोने, संचित चौधरी, अंकुर काकटकर, वैभव चिंचाळकर तसेच मालिकेची निर्माती आणि अभिनेता सुबोध भावे ची बायको मंजिरी भावे सुद्धा दिसत आहेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App