नितीश कुमारांसह ‘I.N.D.I.A’ आघाडीवर केली आहे जोरदार टीका
विशेष प्रतिनिधी
गुना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्य्यावर बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून, त्यांच्यावर जबरदस्त टीका झाली. अखेर त्यांना स्वत: माफी मागावी लागली. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्यप्रदेशातील गुना येथे एका रॅलीला संबोधित करताना नितीश कुमार यांच्यासह इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. Prime Minister Narendra Modis criticism on Chief Minister Nitish Kumar and India Alliance
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, ” इंडी आघाडीचा एकही नेता माता-भगिनींबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात एक शब्दही बोलण्यास तयार नाही. ते तुमचं काय भलं करू शकता? किती दुर्दैव आहे, अजून किती खालच्या पातळीवर जाल. जगभरात देशाला अपमानित करत आहात. इंडिया आघाडीच्या नेत्याने विधानसभेत माता-भगिणींच्या उपस्थितीत अशा प्रकारची विधानं केली, त्यांना काहीच लाज वाटत नाही.”
ही ‘नमो भारत’ ट्रेन नव्या भारताचा नवा प्रवास आणि नवे संकल्प परिभाषित करते – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदी म्हणाले, ”जे इंडी आघाडीचे नेते झेंडा घेऊन फिरत आहेत, जे देशातील सध्याचे सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळखेळत आहे. त्याच इंडी आघाडीच्या नेत्याने विधानसभेत जिथे माता-भगिनींची उपस्थिती होती, कोणी कल्पनाही करू शकत नाही की अशा भाषेत गलिच्छ वक्तव्यं केली.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App