जाणून घ्या कुठे आणि नेमकं काय म्हणाले आहेत? Rahul Gandhi goes to the temple only for elections and does not go to the Ram temple Himanta Biswa Sarma
विशेष प्रतिनिधी
खंडवा : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचे बडे नेते काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. या मालिकेत खंडवा येथे पोहोचलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
ते म्हणाले की, ”राहुल गांधी कधीच रामललाच्या मंदिरात गेले नाहीत. ते केवळ निवडणुकीच्या वेळी मंदिरात जातात आणि तेही गुपचूप आणि फक्त त्या मंदिरात जातात जिथे बाबरच्या लोकांची कोणतीही तक्रार नसते. राम मंदिरात गेल्याने बाबर लोक चिडतील, म्हणून भीतीपोटी ते राम मंदिरात जात नाहीत.”
याशिवाय बिस्वा म्हणाले, “म्हणूनच मला कमलनाथ यांना सांगायचे आहे की राममंदिर हे भाजपचे आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण मी हमी देऊ शकतो की राम मंदिर काँग्रेसचे नाही.” तसेच हिमंता बिस्वा इथेच थांबले नाहीत. ते म्हणाले की मी छत्तीसगडमध्ये होतो आणि अकबराच्या विरोधात का बोललो म्हणून काँग्रेसने माझी तक्रार केली, मी म्हणतो की या देशात जन्माला आल्याने मी बाबर, अकबर औरंगजेबाविरुद्ध बोलणार नाही, तर मग मी कोणाच्या विरोधात बोलणार?”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App