केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. यावेळी अपघातात एकाचा मृत्यू झाला. पटेल यांच्यासह तीन जण जखमी झाले. पटेल यांच्या कारला नरसिंगपूरजवळ अपघात झाला. त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. Union Minister Pralhad Patel’s vehicle accident Three injured one killed

अमरवाडा पोलीस स्टेशन हद्दीजवळ सिंगोडी बायपासवर हा अपघात झाला. पटेल छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने जात होते. यादरम्यान वाटेत एक दुचाकी अचानक समोर आली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पटेल यांची गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर उलटली.

यामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला असून कारचे पूर्ण नुकसान झाले. पटेल यांच्यासोबत कारमध्ये उपस्थित असलेले लोक जखमी झाले .पटेल यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

Union Minister Pralhad Patel’s vehicle accident Three injured one killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात