महाराष्ट्रात आता ठाकरे – पवारांमध्ये राजकी चुरस; पण ती पहिल्या – दुसऱ्या क्रमांकासाठी नव्हे तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे बघितले गेले, यातले निकाल महायुतीच्या बाजूने लागले असून महायुतीने चार आकडी संख्या गाठली आहे, तर महाराष्ट्रावर आत्तापर्यंत संपूर्ण वर्चस्व राखून असलेल्या ठाकरे – पवारांची प्रचंड पीछेहाट झाली आहे. Thackeray-Pawar politics in Maharashtra now

या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे – पवारांमध्ये चुरस जरूर निर्माण झाली, पण ती चुरस पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठी नव्हे, तर ती पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी लागली आहे. कारण पहिले चार क्रमांक भाजप, अजितदादा गट, एकनाथ शिंदे गट आणि काँग्रेस यांनी पटकावले आहेत. पाचव्या क्रमांकावर शरद पवार गट आहे, तर ठाकरे गट सहाव्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहे.

ग्रामपंचायत निवडणूक निकालानुसार भाजपने 716, अजितदादा गटाने 406, शिंदे गटाने 247, काँग्रेसने 205, ठाकरे गटाने 113, तर शरद पवार गटाने फक्त 185 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. शरद पवार गट मतमोजणीची दुपार उलटली तरी डबल डिजिटच्या बाहेर पडू शकला नव्हता. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात शरद पवार गटाने ट्रिपल डिजिट गाठला.



महाराष्ट्रात मुंबईसह शहरी भागांवर ठाकरेंचे वर्चस्व आहे आणि ग्रामीण भागावर शरद पवारांची जबरदस्त पकड आहे, असा समज गेली कित्येक वर्षे मराठी माध्यमांनी पसरविला होता, पण तो समज गैर होता, हेच ग्रामीण भागातील मतदारांनी दाखवून दिले. शरद पवारांच्या वर्चस्वाचे परसेप्शनच ग्रामीण भागाने उद्ध्वस्त केले. खुद्द बारामती तालुक्यात शरद पवार गटाच्या वाट्याला 31 पैकी 0 ग्रामपंचायती आल्या आहेत. अजित पवार गटाकडे 24, तर भाजपकडे 2 ग्रामपंचायती आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणावर चार-पाच दशके वर्चस्व गाजवून राहिलेल्या ठाकरे आणि पवार यांच्यावर महाराष्ट्रात पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाची लढाई एकमेकांमध्येच लढण्याची वेळ मतदारांनी आणली आहे.

Thackeray-Pawar politics in Maharashtra now

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात